Washim : खासगी बस अन् टँकरचा भीषण अपघात; तीन ठार, ८ जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Washim Bus Tanker Accident

Washim : खासगी बस अन् टँकरचा भीषण अपघात; तीन ठार, ८ जण जखमी

वाशिम : वाशिमजवळ खासगी बस आणि टँकरचा भीषण अपघात (Washim Bus Tanker Accident) झाला आहे. यामध्ये तीन जण जागीच ठार झाले असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

हेही वाचा: सुरू होताच संसाराचा शेवट, फोटोशूटसाठी गेलेल्या नवरदेवाचा मृत्यू

वाशिम ते अकोला या महामार्गावर (Washim Akola Highway) वाटाणे लॉनसमोर आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पुण्यावरून यवतमाळला जाणाऱ्या खासगी बस आणि समृध्दी महामार्गावर चालणाऱ्या पाण्याच्या टॅंकरची एकमेकांस धडक बसल्याने ही भीषण दुर्घटना घडली. पाण्याच्या टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस आणि टँकरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता अतिशय भीषण होती, त्यामुळे टँकरमधील चालक आणि क्लीनर जागीच ठार झाले. तर खासगी बसमधील एक ठार आणि 7 जण जखमी झाले आहे. अपघातातील जखमींवर येथील जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गंभीर जखमीला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. वृत्त लिहीस्तोर मृतक व जखमींची ओळख पटविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.

Web Title: Three Died 8 Injured In Bus Tanker Accident Washim Akola Highway

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Washimaccident