Leopard Skin Smuggling : बिबट्याची कातडी विक्री करताना तिघांना अटक; अकोटात वनविभाग व पुण्याच्या डीआरआय पथकाची संयुक्त कारवाई
Wildlife Crime : अकोट रेल्वे स्टेशनजवळ बिबट्याची पूर्ण कातडी विक्री करण्याच्या बेतात असलेल्या तीन तस्करांना अकोला वनविभाग व पुण्याच्या डीआरआय पथकाने रंगेहात अटक केली. २७ जानेवारी रोजी हा सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
अकोला : बिबट्याची पूर्ण शरीराची कातडी विक्री करण्याच्या बेतात असणाऱ्या तीन तस्करांना दि.२७ जानेवारी रोजी, अकोट रेल्वे स्टेशन नजिकच्या पुलाजवळ रंगेहात अटक करण्यात आली. पुणे येथील डीआरआय पथक व अकोला वनविभाग यांनी सापळा रचून संयुक्तपणे ही कारवाई केली.