थेट सरपंच होऊन कारभार करणारी मूर्तिजापुरातील तीन भावंडे

समाजकार्याची आवड असणाऱ्या तीन पैकी दोन मुली व लहान मुलगा आपापल्या गावात सरपंच पद भूषवीत आहेत
Three siblings from Murtijapur holding position as Sarpanch akola
Three siblings from Murtijapur holding position as Sarpanch akola sakal
Updated on

मूर्तिजापूर : तीन भावंडे आपापल्या गावात थेट निवडणुकीत निवडून येत सरपंचपदाचा कार्यभार यशस्वीरित्या सांभाळत असल्याची आगळिक कदाचित प्रथमच निदर्शनास येत असावी. मूर्तिजापूर तालुक्यातील दताळ्याचे डाॅ. रमेश रूपराव जायले सेवानिवृत्त शिक्षक आहेत. पत्नी, तीन विवाहीत मुली व दोन मुले असा त्यांचा परिवार. तीनही मुलींचे लग्न होऊन त्या आपापल्या सासरी सुखाचा संसार करत आहेत. सुरुवातीपासून समाजकार्याची आवड असणाऱ्या तीन पैकी दोन मुली व लहान मुलगा आपापल्या गावात सरपंच पद भूषवीत आहेत.

अर्पण रमेश जायले हा मुलगा मूर्तिजापूर तालुक्यातील दताळा (वहीतपूर) येथील सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत निवडून आला असून, सध्या ग्रमपंचायतीचा कारभार बघत आहे. त्याचा कार्यकाल यावर्षी ता. २७ डिसेंबरपर्यंत आहे. मुलगी वैशाली ज्ञानेश्वर काळंके अकोट तालुक्यातील धामणगावच्या सरपंचपदी थेट निवडणुकीत विजयी झाली असून, तिचा सरपंचपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ यंदा ता. २१ डिसेंबरपर्यंत आहे. दुसरी मुलगी किरण नितीन काळे मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरी (बपोरी) च्या सरपंचपदी बिनविरोध निवडून आली असून, तिचा सरपंचपदाचा कार्यकाळ, ता. ८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आहे.

तिन्ही भावंडाच्या मते त्यांना जनसेवेचा वडीलांकडून वारसा मिळाला. भटोरीच्या नितीन विद्यालयातून शिक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या त्यांच्या वडीलांचे डीएचएमएस हे वैद्यकीय शिक्षण झाले आहे. ते शाळेतून घरी परतल्यावर स्वतःला रूग्णसेवेत झोकून द्यायचे. याच कारणामुळे सेवाभाव हा सगळ्या कुटुंबात खोलवर रूजला. ज्याप्रमाणे सगळी लहान मुलं आपल्या आई-वडलांना बघून लहानची मोठी होतात तसेच आम्हीही झालो. त्याचाच परिणाम म्हणजे आज कुटुंबाची जबाबदारी सांभाळत गाव सांभाळण्याची जवाबदारी आम्हाला मिळाली. व्यक्तीगत अनुभवानुसार भौतिक विकासासोबतच गावाचा विशेष करून महिलांनाचा दृष्टिकोन, विचार बदलने आवश्यक आहे. ज्याप्रमाणे कुटुंबाची दशा व दिशा बदलण्याकरिता महिला केन्द्रस्थानी असते तेच स्थान गावाच्या विकासात सुद्धा महिलांचे असायला हवे. त्यामुळे विकासकामांना शाश्वतता प्राप्त होईल. स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना, दलित वस्ती सुधार योजना जनतेपर्यत मोठ्या प्रमाणात पोहचविल्या. आमदार निधी, खासदार निधी, ३०५४, ५०५४ असे विविध लेखाशिष॔द्वारे कामे मंजूर करून गावात रस्ते, नाल्या, सभागृह ईत्यादी विकासात्मक कामे घडवून आणली. सरपंच असेपर्यंतच नाहीतर आपल्या आयुष्याचा शेवट पर्यंत जनसेवा करण्याचा मानस य भावंडांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com