Akola News: खैरखेड गावात वाघाचा धुमाकूळ! नागरिक आणि शेतमजूर भयभीत, वनविभाग सतर्क
Tiger Roams: खैरखेड गावातील डेअरी फार्मजवळ वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली; सणाच्या हंगामात गावकरी आणि शेतीतील जनावरांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने गस्त वाढवली आहे.
अडगाव: लगतच्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नरनाळा वनविभागांतर्गत येणाऱ्या खैरखेड या गावात गेल्या आठ दिवसांपासून दोनतीनदा नजरेस पडलेल्या वाघामुळे दहशत निर्माण झाली आहे.