.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अकोला : शहर वाहतुकीला कंट्रोल करण्यासाठी अकोला वाहतूक नियंत्रण कक्षात केवळ ३५ पोलिस कर्मचारी दैनंदिन कर्तव्यावर हजर असतात. पोलिस दलात ६० अंमलदारांचा समावेश असून त्यापैकी ५० टक्के कर्मचारी प्रत्यक्ष वाहनांची कंट्रोलिंगसाठी शहरात ड्युटी बजावतात. एकीकडे वाढत असलेली वाहनांची संख्या तर दुसरीकडे कमी मनुष्यबळ अशी परिस्थिती असल्याने वाहतूक नियमनाचे तीनतेरा वाजले आहेत.