रॅपिड ॲन्टीजन टेस्ट : आज दिवसभरात 121 चाचण्या, 13 कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात 121 चाचण्या झाल्या. त्यात 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

अकोला : कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात 121 चाचण्या झाल्या. त्यात 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

हे ही वाचा : आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांचे सर्व पक्षीयांना आवाहन

आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे

अकोला ग्रामीण येथे सहा चाचण्या झाल्या. त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. अकोट, बार्शीटाकळी, पातूर, मुर्तिजापूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही. बाळापूर येथे 15 चाचण्या झाल्या, त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही. अकोला आयएमए येथे 21 चाचण्या झाल्या, त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 25 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या, त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.

वैद्यकीय महाविद्यालय येथे 48 चाचण्या झाल्या, त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर हेडगेवार लॅब येथे सहा चाचण्या झाल्या, त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. असे दिवसभरात 121 चाचण्यांमध्ये 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आजपर्यंत 23,767 चाचण्या झाल्या त्यात 1661 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today 13 corona positives have been found in Akola