esakal | हुंड्यासाठी छळ : ‘तुझ्या वडिलांनी फक्त पाच ग्रॅमची अंगठी दिली’
sakal

बोलून बातमी शोधा

हुंड्यासाठी छळ : ‘तुझ्या वडिलांनी फक्त पाच ग्रॅमची अंगठी दिली’

हुंड्यासाठी छळ : ‘तुझ्या वडिलांनी फक्त पाच ग्रॅमची अंगठी दिली’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोताळा (जि. बुलडाणा) : लग्नात हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून २५ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरकडील आठ जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सासरकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार वैशाली प्रशांत जाधव (२५, रा. फर्दापूर ह.मु. काबरखेड) या विवाहितेने बोराखेडी पोलिसांत केली होती. (Torture-for-dowry-Crimes-against-eight-people-Buldana-Crime-news-nad86)

वैशालीचा विवाह १७ फेब्रुवारी २०१९ रोजी फर्दापूर येथील प्रशांत संजय जाधव यांच्यासोबत झाला. लग्नानंतर विवाहिता सासरी नांदत असताना सासरकडील मंडळीने दोन ते तीन महिने चांगली वागणूक दिली. त्यानंतर लहानसहान गोष्टीवरून सासरकडील मंडळी त्रास देऊ लागले. लग्नात आठ ग्रॅम सोन्याची अंगठी मागितली होती. मात्र, तुझ्या वडिलांनी फक्त पाच ग्रॅमची अंगठी दिली. तसेच लग्नात हुंडासुद्धा कमी दिला, असे म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. सोबतच गाडी घेण्यासाठी माहेरवरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला.

हेही वाचा: अकोला : आदिवासी शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या; दुबार पेरणीचे संकट

आरोपींमध्ये पती प्रशांत संजय जाधव, सासू पंचशीला संजय जाधव, सासरा संजय जंगलू जाधव, मयुरी संजय जाधव, सुरेश गोंडू जाधव (सर्व रा. फर्दापूर), मनीषा शांताराम तायडे (रा. तळणी), विलास बळीराम प्रधान, उज्ज्वला विलास प्रधान (दोघे रा. बोराखेडी) यांचा समावेश आहे. हा प्रकार एक जून २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

(Torture-for-dowry-Crimes-against-eight-people-Buldana-Crime-news-nad86)

loading image