esakal | बाजार समितीतील व्यवहार तिसऱ्या दिवशीही बंद
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समितीतील व्यवहार तिसऱ्या दिवशीही बंद

बाजार समितीतील व्यवहार तिसऱ्या दिवशीही बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला, ः केंद्राने डाळवर्गीय धान्याच्या साठ्यावर मर्यादेची अट टाकल्याचा विरोध करीत गेले तीन दिवसांपासून व्यापाऱ्यांनी संप सुरू केला आहे. अकोला जिल्ह्यातील सर्वच प्रमुख बाजारांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी व्यवहार बंद राहल्याने शुकशुकाट पसरल्याचे दिसून आले. संप कधी मिटेल याबाबत स्थानिक पातळीवर कुठल्याही प्रकारची माहिती यंत्रणांकडे उपलब्ध नाही. (Trading in the market committee also closed on the third day)

हेही वाचा: पोटनिवडणूक; आठ उमेदवारांचे अर्ज बाद


केंद्र शासनाने बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना डाळवर्गीय साठ्याची मर्यादा निश्‍चित केली आहे. ही मर्यादा ऑक्टोबर २०२१ पर्यंत राहणार आहे. त्यामध्ये घाऊक व्यापाऱ्यांना १०० मेट्रीक टन तर किरकोळ व्यापाऱ्यांना ५० मेट्रीक टनाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. ही मर्यादा अत्यंत कमी असल्याने याचा विरोध करीत व्यापारी, अडत्यांनी संप सुरु केला. सोमवार (ता. पाच) पासून अकोला, अकोट, मूर्तीजापूर, तेल्हारा या प्रमुख बाजारांमध्‍ये बंद आहे. परिणामी दररोज होणारी लाखोंची उलाढाल थांबलेली आहे.

हेही वाचा: खेड्यापाड्यात काम करणाऱ्या युवकाला मिळाली लंडनमध्ये स्कॉलरशिप

आवक कमी
व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम बाजार समित्यांच्या व्यवहारांवर झालेला आहे. मात्र, सध्या तुलनेने आवक प्रत्येकच ठिकाणी कमी असल्याचे प्रभाव कमी दिसून येत आहे. व्यापारी आपला संप कधी मागे घेतील याबाबत स्थानिक पातळीवर कुठलाही संपर्क किंवा माहिती अद्याप त्यांच्याकडून देण्यात आलेली नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. देशव्यापी संप असल्याने व्यापाऱ्यांच्या संघटना निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत.


Trading in the market committee also closed on the third day

loading image