esakal | खेड्यापाड्यात काम करणाऱ्या युवकाला मिळाली लंडनमध्ये स्कॉलरशिप
sakal

बोलून बातमी शोधा

खेड्यापाड्यात काम करणाऱ्या युवकाला मिळाली लंडनमध्ये स्कॉलरशिप

खेड्यापाड्यात काम करणाऱ्या युवकाला मिळाली लंडनमध्ये स्कॉलरशिप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा ः प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे लपलेला असतो त्याच्या संघर्षाचा इतिहास, त्याने त्याच्या आयुष्यात खाल्लेल्या खस्ता आणि मरणासन्न अवस्था, खर्‍या अर्थाने त्याच्या आयुष्याला आकार देण्याचे काम करत असतात.आणि हाच संघर्ष त्या व्यक्तीला इच्छित ठिकाणी घेऊन जात असतो. म्हणूनच, यशाच्या आसमंतावर त्यांच्या किर्तीचा झेंडा डौलाने फडकत असतो. असाच काहीसा प्रवास राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे यांचा आहे. (A young man working in the countryside received a scholarship in London)

हेही वाचा: अकोटवरून रोज धावणार रेल्वे!

शिवेनिंग स्कॉलरशिप ही अत्यंत मानाची स्कॉलरशिप मानली जाते. त्यासाठी 160 देशांमधील 63 हजार विद्यार्थ्यांनी आवेदन केले होते. देशात व समाजात बदल घडवू पाहणार्‍या तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी जवळपास 45 लाख रूपयांची ही स्कॉलरशिप मिळते. राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे याला जगातील नामांकित 18 विद्यापीठांनी आपल्या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आमंत्रित केले असून, आता लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारे ते लंडन हा शैक्षणिक प्रवासाचा टप्पा राजुने गाठला आहे.

हेही वाचा: माजी मंत्री मखराम पवार यांच्या पत्नीचे अतिक्रमण

यामुळेे मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. राजू केंद्रे यांचा जीवन प्रवासही धक्क करणारा आहे. मेळघाट सारख्या दुर्गम भागात, धडक मोहिमेचे. मेळघाटामध्ये अत्यंत तळमळीने काम करणारा राजू केंद्रे आज मात्र नव्या वळणावर प्रवासाला सुरवात करतोय. लोणार ते लंडनचा प्रवास हे तेवढ सोप सुद्धा नाही. मेळघाट मध्ये दोन वर्षे पूर्णवेळ काम केल्यानंतर, टाटा सामाजिक विज्ञान संस्थे सारख्या नामांकीत संस्थेत ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन, महाराष्ट्र शासनासोबत मुख्यमंत्री फेलोशिप मध्ये काम करणे, समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक, पहिल्याच प्रयत्नात नेट व सेट उत्तीर्ण झालेला हा तरुण, आय-पॅक सारख्या राष्ट्रीय पातळीवर संस्थेसोबत काम केले.

हेही वाचा: सहा महिन्यात ६० हजार वाहनचालकांनी मोडले नियम

आमदार रोहित पवार यांच्या सोबतकामाचा अनुभव व समविचारी तरुणांना एकलव्य संस्थेची स्थापना केली. महाराष्ट्रभरात शेकडो तरुणांची संघटन बांधणी करून वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण आदिवासी भागातून नेतृत्व, वंचित घटकातील उच्च शिक्षणासाठी प्लॅटफॉर्म तयार केला. गेल्या 3 ते 4 वर्षात 100 युवकांना देशातील चांगल्या कॉलेज, विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम करत आहे.

आपत्ती सारख्या नैसर्गिक संकटात राहतच्या माध्यमातून उभे केलेले मदत कार्य एक वेगळी ओळख ठरली. अनेक सामाजिक कार्यातील राजू केंद्रेचा प्रवास हा संघर्षमय ठरला आहे. बदलत्या काळात विविध क्षेत्रातील शिक्षण आणि करिअरच्या संधीविषयी ग्रामीण भागातील विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यासाठी दरवर्षी राजु केंद्रे गाव पातळीवर विद्यार्थी प्रोत्साहनपर दिशादर्शक कार्यक्रम विद्यार्थी व मित्रांच्या माध्यमातून राबवित असतो. शिक्षणाच्या पारंपारिक चौकटी ओलांडून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये नवा दृष्टिकोन आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

हेही वाचा: अकोला जिल्ह्यातील १२.४५ लाख लाभार्थ्यांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य!

एकलव्यचा मूळ कार्यक्रम विद्यार्थी प्रोत्साहनपर मार्गदर्शन सोहळा असून, गेल्या सात वर्षात अविरतपणे राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम लोणार, सिंदखेडराजा भागात हळूहळू विस्तारत आहे. एका गावातून सुरू झालेला हा कार्यक्रम आता पंचक्रोशीतील सर्व गावांत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गावपातळीवर टिम तयार करून हा कार्यक्रम सतत अखंडपणे चालविण्यात येत आहे. गाव खेड्यातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे यासाठी नेहमीच राजु केंद्रेची धडपड असते. घरची परिस्थिती बेताची आणि वडील शेतकरी असून, शिक्षणाच्या प्रवाहात अनेकांना पोहचण्याचे स्वप्नं राजू केंद्रे यांनी पाहिले आहे. त्यांचा आदर्श आता ग्रामीण भागातील युवकही घेऊ लागले आहे.

A young man working in the countryside received a scholarship in London

loading image
go to top