अकोला : पोलिस निरीक्षकांचा बदल्या; एलसीबीत संतोष महल्ले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला : पोलिस निरीक्षकांचा बदल्या; एलसीबीत संतोष महल्ले

अकोला : पोलिस निरीक्षकांचा बदल्या; एलसीबीत संतोष महल्ले

अकोला : जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हाबाहेर बदली झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शुक्रवारी १३ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. दोन अधिकाऱ्यांना आहे त्याच ठिकाणी मुदत वाढ देण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा या चर्चेतील जागेसाठी संतोष महल्ले यांची तर वाहतूक नियंत्रण शाखेत विलास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यातील चार ठाणेदारांची बदली जिल्ह्याबाहेर झाली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेसह वाहतूक शाखेतील पोलिस निरीक्षकांचे पद रिक्त झाले होते. खदानच्या पोलिस निरीक्षकांचे पदही रिक्त होते. त्यामुळे शुक्रवारी (ता. २०) पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील काही पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय व विनंतीवरून बदल्या केल्यात.

हेही वाचा: भाजप आमदाराच्या घोटाळ्यावर किरीट सोमय्या गप्प का?

त्यानुसार अकोट शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक संतोष महल्ले यांना स्थानिक गुन्हे शाखेत प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. सिव्हिल लाइन्सचे पोलिस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांना त्याच ठिकाणी मुदत वाढ देण्यात आली. रामदासपेठचे पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने यांची विनंतीवरून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. प्रकाश अहिरे यांना नियंत्रण कक्षातून संतोष महल्ले यांच्या जागेवर अकोट शहर पोलिस स्टेशनमध्ये नियुक्ती देण्यात आली. दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांच्याकडे आता शहर वाहतूक शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नियंत्रण कक्षातील श्रीरंग सणस यांच्याकडे खदान पोलिस स्टेशनच्या प्रभार सोपविण्यात आला आहे. तेल्हाऱ्याचे ठाणेदार नितीन देशमुख यांच्याकडे अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. देशमुख यांच्या जागेवर अकोट ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड यांची नियुक्ती करण्यात आली.

याशिवाय उज्ज्वला देवकर यांच्याकडे सायबर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक संजय गवई यांची खदानमधून रामदापेठ, शेख रहीम गफार यांची मूर्तिजापूर ग्रामीणमधून जुने शहर, ज्योती विल्हेकर यांना अकोट शहरामध्ये मुदतवाढ तर सुरेंद्र राऊत यांची रामदासपेठ येथून दहिहांडा ठाणेदार म्हणून बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा: संभाजीराजे हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? तातडीने अटक करा

जिल्ह्यातील काही पोलिस निरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली झाली होती. त्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार शुक्रवारी बदलीचे आदेश देण्यात आले. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने बदली झालेल्या जागेवर नियुक्त होण्यास सांगितले आहे.
- जी. श्रीधर, पोलिस अधीक्षक, अकोला

Web Title: Transfers Of Police Inspectors Akola District News Santosh Mahal In Lcb

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..