तृतीयपंथीयांना समाजाने स्वीकारावे; अन्वी घोराल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

transgender as human beings should accepted by society Washim

तृतीयपंथीयांना समाजाने स्वीकारावे; अन्वी घोराल

वाशीम : तृतीयपंथीयांना सामाजिक समता मिळून त्यांचे आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरण व्हावे, याकरीता जिल्ह्यातील लोकहिताचे उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या राजरत्न अल्पसंख्यांक शिक्षण प्रसारक व बहु. संस्था, वाशीम व नागार्जुन बौद्ध अल्पसंख्यांक सेवाभावी संस्था, वाशीमचे वतीने समता दिवस तृतीयपंथी यांच्या समवेत देवपेठ येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

मानवी मुलभूत हक्कानुसार, समानतेच्या तत्त्वानुसार तृतीय पंथीयांना देखील व्यक्ती म्हणून समाजाने स्वीकारले पाहिजे. न्यायाव्यवस्था जशी लिंगभेद करीत नाही तसे समाजानेही करू नये. प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे. तृतीयापंथीयांच्या अशा स्थितीला समाजाची मानसिकताच जबाबदार असल्याचे परखड मत त्यांनी समता दिनी बोलून दाखविले.राजरत्न संस्था व नागार्जुन संस्थेने समता दिनी केलेला सन्मान आमच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रगतीकडचे जिल्ह्यातील पहिले पाऊलच म्हणावे लागेल, अशी भावूक प्रतिक्रिया अन्वी घोराल यांनी दिली. यावेळी त्यांचा मान्यवरांचे हस्ते हार घालून सन्मान करण्यात आला.

स्वामी विवेकानंदांचे जीवन चरीत्र देऊन पेढे वाटण्यात आले. काय॔क्रमाचे संचालन अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष पि.एस. खंदारे यांनी केले. प्रास्ताविक राजरत्न संस्थेचे विनोद पट्टेबहादुर यांनी केले.यावेळी रेखाताई ऊखळकर, स्वर्णमालाताई बेहरे, शोभाताई भक्कड, मिनाताई शर्मा, प्रितीताई तिवारी, मनिषा ताई दुरतकर, सुनिता ताई वर्मा, पुजाताई देशपांडे,नागार्जून बौद्ध सेवाभावी संस्थेच्या कुसुमाताई सोनुने, एनडीएमजेचे शाहिर दत्तराव वानखेडे, ओम दुरतकर, स्वप्निल वर्मा, राजरत्न संस्थेच्या वैशाली खोब्रागडे-मेश्राम, मेघा इंगळे, वैशाली इंगोले, लक्ष्मी ठोंबरे, वैष्णवी देशमुख यांची उपस्थिती होती. आभार अभिषेक पवार यांनी मानले.

Web Title: Transgender As Human Beings Should Accepted By Society Washim

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..