esakal | जिल्हा परिषदेच्या कोविड केअर सेंटरमध्ये १२ जणांवर उपचार

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषदेच्या कोविड केअर सेंटरमध्ये १२ जणांवर उपचार
जिल्हा परिषदेच्या कोविड केअर सेंटरमध्ये १२ जणांवर उपचार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्हा परिषदेमार्फत सिव्हील लाईन येथील कर्मचारी भवनात कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये गुरुवार (ता. २९) पर्यंत उपचारासाठी १२ रुग्णांना भरती करण्यात आले आहे. सदर केंद्र लवकरात-लवकर सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन व सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीकडून प्रयत्न सुरू हाेते. सदर केंद्र काेराेना बाधितांसाठी नवसंजीवनी देणारे ठरत आहे.

जिल्ह्यात सतत कोरोना बाधितांमध्ये झपाट्‍याने वाढ होत आहे. शासकीय व खासगी रूग्णालयांमध्ये कमी प्रमाणात ऑक्सिजनच्या खाटा उपलब्ध आहेत. कोरोनाग्रस्तांचा सर्वाधिक ताण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर पडत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांवर योग्य उपचार करता यावे यासाठी जि.प. कर्मचारी भवन येथील समर्पित काेविड आराेग्य केंद्र सुरू करण्यात आले. याठिकाणी राष्ट्रीय आराेग्य मिशन व जिल्हा वार्षिक याेजनेतून मिळलेल्या निधीतून खाटांसह अन्य साहित्य खरेदी करण्यात आले. काही साहित्य दानशूर व्यक्तिंनीही भेटही दिले.

प्रकृती स्थिर असलेल्यांवर उपचार

जिल्हा परिषदेचे काेविड आराेग्य केंद्रात तूर्तास सर्वाेपचार रूग्णालयातून रेफर झालेल्या रुग्णांवर सेंटरमध्ये उपचार करण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. २७) सदर केंद्रात सुरुवातीला सहा रुग्ण भरती करण्यात आले. त्यानंतर त्यात वाढ झाल्याने गुरुवारी (ता. २९) उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १२ वर पोहचली.

संपादन - विवेक मेतकर