esakal | सकाळच्‍या वेळी नागरिकांच्या गर्दीत कमालीची वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळच्‍या वेळी नागरिकांच्या गर्दीत कमालीची वाढ

सकाळच्‍या वेळी नागरिकांच्या गर्दीत कमालीची वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि.वाशीम) ः कोरोना महामारीने नागरिक भयभीत झाले आहेत. शहरातील प्रत्येक कॉलनीत रुग्ण आढळून येत असून, ग्रामीण भागातही त्याने आपले पाय रोयले आहेत. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी शासनाने गर्दी होत असलेल्या ठिकाणी अनेक दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवली आहेत. त्यामुळे खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारात गर्दी होताना दिसून येत आहे. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरात सकाळच्या वेळेत दुकानावर खूप मोठी गर्दी होत आहे. अनेकांच्या तोंडाला मास्क लावलेला नसतो, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल जात नसल्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे कठीण झाले आहे. गर्दीवर नियंत्रणासाठी सकाळी शहरी भागातल्या ग्राहकांनी व दुपारी ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी वेगवेगळी वेळ ठरवून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळच्या विनाकारण फिरण्याच्या गर्दीवर नियंत्रणाची अत्यंत आवश्यक निर्माण झाली आहे. तशी मागणी सुद्धा सुज्ञ नागरिकांतून होत आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. स्थानिक पोलिस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंग सोनोने व इतर पोलिस कर्मचाऱ्यांरी सकाळी अकरा वाजतापासूनच व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करत आहेत. त्यांनी काही मोठ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई सुद्धा केली आहे.

ठाणेदारच्या दंडात्मक कारवाईच्या भीतीने व्यापारी लोक अकराची वेळ तंतोतंत पाळत आहेत, मात्र सकाळी होत असलेल्या गर्दीच्या ठिकाणी दंंडात्मक कारवाई केल्यास नक्कीच त्यांना आळा बसेल.

loading image