esakal | अॅड.प्रकाश आंबेडकरांसह बाराशे लोकांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Twelve hundred people including Akola Adv. Prakash Ambedkar lodged a complaint with the police

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडावे या मागणीसाठी अॅड आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काल दुपारी आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजनांचा आदेश जारी केला आहे. प्रतिबंधात्मक आदेश असतानाही आंदोलनाच्या वेळी मोठा जमाव गोळा झाला होता.

अॅड.प्रकाश आंबेडकरांसह बाराशे लोकांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला : लॉकडाउनच्या प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात असताना जमाव जमवून, मास्क न घालता, फिजिकल डिस्टन्सचे पालन न करता आंदोलन केल्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर, विश्व वारकरी सेनेचे अरुण महाराज बुरघाटे, आनंद चंदनशिवे यांच्यासह अकराशे ते बाराशे लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडावे या मागणीसाठी अॅड आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काल दुपारी आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजनांचा आदेश जारी केला आहे. प्रतिबंधात्मक आदेश असतानाही आंदोलनाच्या वेळी मोठा जमाव गोळा झाला होता.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

आंबेडकर, अरुण महाराज बुरघाटे (रा.मुक्ताबाई मठ, पंढरपूर), आनंद चंदनशिवे (रा. सोलापूर), धनंजय वंजारी, अशोक सोनोणे, रेखाताई ठाकूर, नाम महाराज, बबन शिंदे, सागर गायकवाड (रा. पंढरपूर), रवि सर्वगोड, गणेश महाराज शेटे (रा.अकोला), माऊली हळणवर (रा. इश्वरवठार, ता.पंढरपूर) आणि इतर अकराशे ते बाराशे जणांनी मास्क न घालता, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही.

त्याची दखल घेऊन संचारबंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करुन ठिय्या आंदोलनासाठी एकत्र जमा होऊन मोठ्याने घोषणाबाजी केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.