Akola Accident : पातूर रोडवर भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर!
Accident News : पातूर रोडवर ट्रक व ऑटोमध्ये भीषण अपघात झाला. दोन मृत, चार गंभीर जखमी. मृतांमध्ये एका १३ वर्षीय मुलाचाही समावेश. अकोला जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना वाहनांच्या बेदरकार वेगामुळे घडली.
पातूर : बाळापूर ते पातूर रोडवरील आयटीआय कॉलेज समोर ट्रक व ऑटोची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन जणांना घटनास्थळावरच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना ता. २४ जून रोजी घडली.