धक्कादायक! एक मित्र पडला विहिरीत अन् दुसरा रात्रभर राहिला त्याच्या मृतदेहाजवळ; काय असेल प्रकार...वाचा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 May 2020

आपला मित्र विहिरीत पडला असल्याचे नागरिकांना सांगितले. तेव्हा घटनेची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांना देण्यात आली. त्यावेळी घटनास्थळी पोहचून विहरीत पडलेल्या दोघांनाही बाहेर काढून अकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, विहिरीत अडकलेला मित्र चांगलाच घाबरलेला आहे.

अकोट (जि. अकोला) : शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या पणज येथील दोन मुले अखेर गावातील शेतातील विहरीत आढळून आली, यापैकी एक विहरीतील पाण्यात बुडून मृत पावला असून, दुसरा विहरितील असलेल्या पाईपाला लटकलेला दिसून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

क्लिक करा- Video: गरिबांच्या बादामची श्रीमंती पहा

रात्रभर चालली शोध मोहीम
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पणज येथील दोन अल्पवयीन मित्र दोघेही शुक्रवारी (ता.29) दुपारी एक वाजताच्या दरम्यान सायकल घेऊन बाहेर फिरायला गेले, नंतर तीन वाजेपर्यंत मुलगा घरी न आल्याने त्याच्या एका मुलाच्या आईने त्याच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा मोबाईल बंद येत होता. थोडा वेळ वाट बघून त्यांनी आजूबाजूला शेजारच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली.

अखेर सहा वाजले तरी मुले घरी परत न आल्याने गावात सर्वत्र शोधायला सुरुवात केली. दरम्यान, त्याच वेळी गावातील व्हॉट्सॲप ग्रुपवर दोन्ही मुले दुपारपासून गायब असल्याचे फोटो सर्वत्र व्हायरल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मुले परत आली नसल्याने शेवटी गावातील काही युवकांनी दुचाकीवरून आजूबाजूच्या परिसरात शोधायला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही मुले सापडत नसल्याने अखेर दोन्ही परिवाराकडील लोकांनी अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनला मुले बेपत्ता असल्याची रीतसर तक्रार नोंदवली.

हेही वाचा- अरेरे...शेत शिवारात झाला चक्क लाल अश्रूंचा सडा, पहा काय झाले असे..

दोर टाकून एकाला काढले बाहेर
गावातील नागरिकांनी रात्री दोन वाजेपर्यंत शोध घेऊनही ही मुले कुठेच आढळून आली नाही. गावातील दोन मुले सायकल घेऊन बेपत्ता झाल्याची वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली होती. अखेर शनिवारी सकाळच्या सुमारास बोर्डी नदी लगत असलेल्या जुन्या बोचरा रस्त्यावरील राजेश गडेकर यांच्या शेतातील विहिरीजवळ एक सायकल उभी असल्याचे गावातील काही लोकांना दिसून आले. शेतातील विहिरीजवळ जाऊन शोध घेतला असता दोघापैकी एक मित्र विहरितील पाईपाला अडकलेला आढळला.

याबाबत गावात माहिती दिल्यावर सर्व लोकांनी विहिरीजवळ धाव घेतली. अखेर दोर टाकून त्याला बाहेर काढण्यात आल्यानंतर त्याने आपला मित्र विहिरीत पडला असल्याचे नागरिकांना सांगितले. तेव्हा घटनेची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांना देण्यात आली. त्यावेळी घटनास्थळी पोहचून विहरीत पडलेल्या दोघांनाही बाहेर काढून अकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, विहिरीत अडकलेला मित्र चांगलाच घाबरलेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two missing children were finally found in a well in a akola village field