esakal | डॉ. शेवाळेने रुग्णासोबत केला अनैसर्गिक संभोग! स्टिंग ऑपरेशन | Akola District
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

डॉ. शेवाळेने रुग्णासोबत केला अनैसर्गिक संभोग! स्टिंग ऑपरेशन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : शहरातील सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनच्या हद्दीत डॉ. शेवाळे याने रुग्णासोबत अनैसर्गिक संभोग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी डॉ. शेवाळे यास अटक केली आहे.

सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनला इसमाने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे मित्र व ते डॉ. अनंता ज्ञानेश्वर शेवाळे (४१, रा. संभाजीनगर) याच्याकडे उपचारासाठी गेले होते. डॉक्टराने त्यांच्यासोबत जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध साधला. तसेच त्यांना वारंवार फोन करून त्रास देत होता. त्याअनुषंगाने डॉक्टरच्या कुकृत्याचे स्टिंग ऑपरेशन करावे म्हणून फिर्यादीने डॉक्टराकडे उपचारासाठी गेले असता डॉ. अनंता ज्ञानेश्वर शेवाळे याने जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: ‘टू फिंगर्स टेस्ट’बाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे

या प्रकाराचे व्हिडिओ चित्रण करण्यात आले असून, सिव्हिल पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. यातक्रारीवरून पोलिसांनी आरोपी डॉ. अनंता ज्ञानेश्वर शेवाळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.

loading image
go to top