esakal | सोयाबीन काढणीच्या कामाला वेग
sakal

बोलून बातमी शोधा

सोयाबीन

वाशीम : सोयाबीन काढणीच्या कामाला वेग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मानोरा (जि. वाशीम) : सोयाबीन सोंगणीचे कामाला सुरुवात झाली असून, परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्याने सोयाबीन काढणीला तालुक्यात सुरुवात झाली आहे. आता आणखी पाऊस येईल या भीतीने सोयाबीन काढणीला चांगलाच वेग आल्याचे दिसून येत आहे.

सोयाबीन काढणीसाठी ट्रॅक्टरद्वारे चालणाऱ्या मळणी यंत्राला कास्तकारांची पसंती मिळत आहे. त्यामुळे सध्या ट्रॅक्टर मळणी यंत्र धारकांना चांगले दिवस आल्याचे दिसत आहे. अनेकांची सोयाबीन काढण्याचे कामे वेटिंगवर असल्याचे दिसून येत आहे. त्यातच मजूरवर्ग मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.

हेही वाचा: ‘महाराष्ट्र बंद’ला राज्यभरात मोठा प्रतिसाद; अनेक ठिकाणी तणाव

या कालावधीत अल्पभूधारक शेतकऱ्यांनी थोड्या स्वरूपात घरी सोयाबीन सोंगणीला प्राधान्य दिले तर, काही गावामध्ये सवडीने सोयाबीन सोंगणी केली जात आहे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागात शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेकांच्या तक्रारी तहसील कार्यालयामध्ये दाखल आहेत. त्यांचा निकाल लागला नाही. रस्ता नसल्याने त्यांचे सोयाबीन परतीच्या पावसामध्ये खराब होण्याचे चिन्ह दिसून येत आहेत. सोयाबीन सोंगूण गंजी लावून शेतात आहे. पण, त्यांना रस्ता नसल्यामुळे त्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

"परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे नुकसान झाले. हवे तसे उत्पन्न झाले नाही. मला तीन एकर शेतीमध्ये १३ क्विंटल उत्पन्न मिळाले. गेल्यावर्षी त्या शेतामध्ये २० क्विंटल उत्पादन झाले होते. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सात क्विंटलने तोट्यात आहे. त्यामुळे राज्य सरकार व पीक विमा कंपनीने ताबडतोब विमा मंजूर करून दिलासा द्यावा."

- सुनील जामदार, प्रगतशील शेतकरी

loading image
go to top