Fuel Price Protest: बैलगाड्या, घोडे, गाढवांसह वंचित बहुजन आघाडीचा महागाईविरोधी अनोखा मोर्चा; इंधनदरवाढ, गॅस टंचाईविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

इंधनदरवाढ, गॅसटंचाई आणि महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचा बैलगाडी, घोडे, गाढवांसह अनोखा मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दीड तास ठिय्या, अधिकाऱ्यांना रस्त्यावर बोलावून निवेदन स्वीकृती
Anti-Inflation Protest: Vanchit Bahujan Aghadi Launches Unique Bullock Cart Rally in Akola

Anti-Inflation Protest: Vanchit Bahujan Aghadi Launches Unique Bullock Cart Rally in Akola

Sakal

Updated on: 

अकोला : पेट्रोल-डिझेल दरवाढ, गॅस टंचाई आणि वाढत्या महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीने सोमवारी (ता. 25) बैलगाडी मोर्चा काढत केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन छेडले. बैलगाडी, घोडे, गाढव, टांगा आणि सायकलींच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या अनोख्या मोर्चाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com