esakal | पार्किंगची व्यवस्था नसताना वाहनांची साेडली हवा
sakal

बोलून बातमी शोधा

पार्किंगची व्यवस्था नसताना वाहनांची साेडली हवा

पार्किंगची व्यवस्था नसताना वाहनांची साेडली हवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्हा परिषदेच्या आवारात कोणत्याच प्रकारची पार्किंग व्यवस्था नसताना किंवा नो पार्किंगचे फलक लावलेले नसताना दुचाकी व चारचाकी वाहनांची हवा सोडण्याचा प्रकार सोमवारी (ता. ५) दुपारच्या दरम्यान घडला. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत व त्यांच्या आदेशानेच हा प्रकार घडल्याने वाहन चालकांना मात्र विनाकारण त्रास सहन करावा लागला. (Vehicles should be parked when there is no parking facility)

हेही वाचा: सहा महिन्यात ६० हजार वाहनचालकांनी मोडले नियम

जिल्हा परिषदेच्या आवारात पेव्हर्स ब्लॉक लावण्याचे काम सुरू आहे. सदर कामाचे निरीक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कटियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यासह इतर सोमवारी कॅफो कार्यालयाजवळ पोहचले. यावेळी त्यांना काही वाहन अव्यवस्थित उभे असल्याचे दिसून आले. त्यामुळे सीईओंनी वाहनांची हवा सोडण्यास सांगताच कर्मचाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी केली. यावेळी इतर अधिकारी व कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.

संपादन - विवेक मेतकर
Vehicles should be parked when there is no parking facility

loading image
go to top