

Vidarbha IT Park Proposal for Local Employment
sakal
योगेश फरफट
अकोला : विदर्भातील अमरावती विभाग व नागपूर (अमरावती, अकोला, यवतमाळ आणि नागपूर) येथील अभियांत्रिकी पदवीधरांना त्यांच्याच भागात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी स्वतंत्र आणि मोठ्या क्षमतेच्या आयटी पार्कची उभारणी करण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी विधिमंडळात केली आहे. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागासंदर्भात प्रश्न उपस्थित करताना त्यांनी ही मागणी केली.