
पोटनिवडणुकीसाठी ४८८ मतदार केंद्रांवर मतदान!
अकोला : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीमधील रिक्त पदाच्या पोट निवडणुकीसाठी जिल्ह्यात ४८८ मतदान केंद्र व तालुकास्तरावर मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी जि.प.,पं.स. निवडणूक संजय खडसे यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार मंगळवारी (ता. ५) मतदान व बुधवारी (ता. ६) मतमोजणी होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात ७७, अकोट तालुक्यात ८१, मूर्तिजापूर तालुक्यात ८३, अकोला तालुक्यात ८५, बाळापूर तालुक्यात ७४, बार्शीटाकळी तालुक्यात ४९ व पातूर तालुक्यात ३९ असे एकूण ४८८ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी सकाळी १० वाजेपासून सुरू होईल.
या ठिकाणी करणार मतमोजणी
तेल्हारा येथे नवीन इमारत तहसिल कार्यालय. अकोट येथे कृषि उत्पन्न बाजार समिती कास्तकार भवन. मूर्तिजापूर येथे शासकीय धान्य नवीन गोडाऊन. अकोला येथे शासकीय धान्य गोदाम जिल्हाधिकारी कार्यालय परिसर. बाळापूर येथे शासकीय धान्य गोदाम. बार्शीटाकळी येथे पंचायत समिती सभागृह तर पातूर येथे पंचायत समिती सभागृह, पातूर या ठिकाणी मतमोजणी निश्चित करण्यात आली आहे.