कोरोना विरुद्धच्या लढाईत एक लाख चाचण्या

VRDL Laboratory for Diagnosis of Covid has been started under the Department of Microbiology, Government Medical College, Akola.
VRDL Laboratory for Diagnosis of Covid has been started under the Department of Microbiology, Government Medical College, Akola.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापित ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेने कोरोना विषाणू नमुन्यांच्या एक लाख चाचण्या पूर्ण केल्या. या एक लाख नमुन्यांच्या चाचण्यात १४९०० (१४.९० टक्के) रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना विरुद्ध जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या लढाईत ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेची ही कामगिरी ‘लाख’ मोलाची ठरली आहे.

कोरोना संकटाच्या काळात अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुक्ष्मजिवशास्त्र विभागाअंतर्गत कोविड-१९ च्या निदानाकरिता ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळा ता.१२ एप्रिल २०२० पासून सुरू करण्यात आली. या प्रयोगशाळेत आरटीपीसीटीआर व्दारे कोविड-१९ च्या संशयित रुग्णांच्या तपासण्या अव्याहतपणे सुरू आहेत. गुरुवार (ता.२१) २०२१ रोजी या प्रयोगशाळेने एक लाख तपासण्या पूर्ण केल्या. तपासणी करण्यात आलेल्या एकूण एक लाख चाचण्यापैकी १४९०० (१४.९० टक्के) रुग्ण हे कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळले आहेत. सुरुवातीला राज्यात ज्या सात प्रयोगशाळा विषाणूजन्य साथीच्या आजारांच्या निदानाकरिता आयसीएमआर व डीएचआर तर्फे महाराष्ट्रात एकूण सात प्रयोगशाळा स्थापित करण्यात आल्या. त्यात अकोला ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेचा समावेश होता.

शेजारील जिल्ह्यांनाही झाली मदत

सुरवातीला अकोला जिल्ह्याव्यतिरिक्त अमरावती, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ येथील तसेच जळगाव येथील रुग्णांचे नमुने सुद्धा या प्रयोगशाळेत तपासण्यात आले. आतापर्यंत बाहेर जिल्ह्यातील तब्बल २४ हजारांपर्यंत नमुने तपासण्यात आले. आता इतर जिल्ह्यांमध्येही कोविड-१९ आयसीएमआर प्रयोगशाळा कार्यान्वीत झाल्यामुळे सध्या फक्त अकोला येथील प्रयोगशाळेत फक्त अकोला जिल्ह्यातील रुग्णांचीच तपासणी करण्यासाठी होत आहे. याच प्रमाणे बुलडाणा व वाशीम येथील प्रयोगशाळा स्थापित करण्याकरीता तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण या प्रयोगशाळेत देण्यात आले व प्रयोगशाळा उभारणीकरिता आवश्यक मदतही येथील तंत्रज्ञांनी केली आहे.

चाचण्यांच्या क्षमतेत वाढ

सुरुवातीला या प्रयोगशाळेची क्षमता दररोज १०० चाचण्या करण्याची होती ती पुढे २५० पर्यंत वाढविण्यात आली. त्यानंतर ही क्षमता वाढविण्याच्या दृष्टिने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या प्रयत्नातून ऑटोमोटेड आएनए इलेकट्रीशन मशीन व अतिरीक्त आयसीएमआर मशीन उपलब्ध झाल्याने आता, ही क्षमता दररोज ७५० नमुने तपासण्याची झालेली आहे. तसेच अपवादात्मक परिस्थितीत या प्रयोगशाळेत दररोज एक हजार ते बाराशे तपासण्या केल्या जाऊ शकतात.

भविष्यातही उपयुक्तता

या प्रयोगशाळेत नमुने तपासणीकरिता लागणारे सहसाहित्य, रसायने इ. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांचे मार्फत हाफकीन संस्था, मुंबई यांचे कडून उपलब्ध करून देण्यात येतात. भविष्यात या प्रयोगशाळेत स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, चिकुन गुनिया, काविळ यासारख्या विषाणूजन्य आजारांचे निदान करता येईल.

अशी होते चाचणीची प्रक्रिया

संशयित रुग्णाच्या घशातील वा नाकातील स्त्राव घेऊन तो परीक्षानळीत साठवला जातो. तेथून तो प्रयोगशाळेत आणल्यानंतर त्याची नोंदणी व संदर्भासाठी आयसीएमआरकडे त्याचे ऑनलाईन विवरण भरले जाते. त्यानंतर काही रसायने टाकून या नमुन्यात संभाव्यतः असलेला विषाणू निष्क्रीय केला जातो. त्यानंतर यंत्राद्वारे त्याचा सार वेगळा करून त्यातून विषाणूचा आरएनए विलग केला जातो. त्यानंतर पॉलिमरेज चेन रिॲक्शनद्वारे नमुना पॉझिटीव्ह आहे की, नाही याचे निदान होते. एका वेळी या यंत्रात ९२ नमुने प्रक्रिया केले जाऊ शकतात. संपूर्ण प्रक्रिया व्हायला चार तासांचा कालावधी लागतो. शक्यतो त्या दिवसाचे नमुने त्याच दिवशी तपासून दिले जातात, असे डॉ. अंभोरे यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com