वानधरण दमदार पावसाच्या प्रतिक्षेत 

तेल्हारा प्रतिनिधी
Saturday, 15 August 2020

गेल्या दोन दिवसांपासून तेल्हारा परिसरात सततधार रिमझिम पाउस सुरू असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे पावसामुळे बळीराजा सुखावला आहे परंतु वानधरण परिसरात मात्र दमदार पावसाची आवश्यक ता आहे कारण वानधारण केवळ ४३ टक्केच भरले आहे  सततधार पावसामुळे काहींच्या घरांची पळझळ झाली आहे. 

तेल्हारा (जि.अकोला)  : गेल्या दोन दिवसांपासून तेल्हारा परिसरात सततधार रिमझिम पाउस सुरू असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे पावसामुळे बळीराजा सुखावला आहे परंतु वानधरण परिसरात मात्र दमदार पावसाची आवश्यक ता आहे कारण वानधारण केवळ ४३ टक्केच भरले आहे  सततधार पावसामुळे काहींच्या घरांची पळझळ झाली आहे. 

 तेल्हारा तालुक्यातील काही भागांमध्ये एक दिवसाआड पाणी येत होते तर आरसुळ भागामध्ये बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततधार  पावसामुळे   शेतकरी सुखावला आहे. अकोला जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्याची तहान भागविनाऱ्या वानधारण पातळीत मात्र धरण परिसरात  दमदार पावसाअभावी धरण केवळ ४३ टक्केच भरले आहे . रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे जुन्या वितामतीच्या घरातील भितीमध्ये पाणी शिरत असल्यामुळे घरांची पळझळ झाली आहे या मध्ये तेल्हारा शहरातील संभाजी चौकातील प्रभाकर मानकर यांच्या घराची पावसामुळे पळझळ झाली आहे पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.  

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
  
 गेल्या अनेक  दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर झाला होता.खंडीत झालेला पावसाळा दोन दिवसांपूर्वी सक्रिय झाला असुन तालुक्यात सर्वदूर पावसाने रिमझिम सुरु केली  आहे.निसर्गाने या पावसाच्या रिमझिममुळे शेतकरी वर्गाला लुप्त झालेल्या '"झडी" ची आठवण करुन दिली आहे.अखंडपणे सुरु असलेल्या रिपरिपमुळे शेतातील पिके हवेसोबत डोलत आहेत या द्रुष्यांमुळे शेतकरी वर्ग कमालीचा आनंदी झाला आहे.निसर्गाच्या या प्रसन्न वागणुकीमुळे जेष्ठ लोकांनी त्यांच्या काळातील पावसाची आठवण करुन आपल्या काळातील आठवणी ताज्या झाल्याचे सांगितले.तासातासांमधून पावसाचा जोर कमी जास्त होत असुन पावसाची संततधार कायम आहे.अजूनही काही दिवस हा पाऊस असाच राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wan Dam in Akola awaits heavy rains