रुग्णवाहिकांसह वैद्यकीय वाहनांवर राहणर वाॅच 

भगवान वानखेडे 
Wednesday, 22 July 2020

बाह्य यंत्रणेद्वारा राबविण्या येईल उपक्रम

अकोला ः  राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रेफेरल ट्रान्सपोर्ट कार्यक्रमातील रुग्णवाहिका व मोबाइल मेडिकल युनिट वाहनांचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने राज्यातील चार हजार 821 वाहनांवर जीपीएस, जीपीआरएस प्रणाली अंतर्गत ट्रॅकर बसविण्यात येणार आहे. हा उपक्रम बाह्य यंत्रणेच्या सहाय्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रेफेरल ट्रान्सपोर्ट कार्यक्रमांतर्गत राज्यातील शासकीय रुग्णवाहिका, मोबाइल मेडिकल युनिट वाहने, आरोग्य विभाग, पर्यवेक्षीय वाहने तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमासाठी भाडेतत्वावर वापरण्यात येणाऱ्या एकूण चार हजार 821 वाहनांवर ‘जीपीएस’ किंवा ‘जीपीआरएस’ यंत्रणा बसविली जाणार आहे. यासोबतच राज्यातील 102 आणि 108 रुग्णावाहिकांचे आरक्षण व मोबाईल मेडिकल युनिटचे ट्रॅकींग करण्यासाठी मोबाइल अ‍ॅप्लिकेश्न तयार करणे, तसेच 102 कॉल सेंटर चालविण्यासाठी बाह्य यंत्रणा नियुक्त करण्यासंदर्भात राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमीत केला. त्यानुसार, राज्यातील 4,821 वैद्यकीय वाहनांवर ट्रॅकर बसविण्यात येणार आहे. 

या वाहनांवर लागणार ट्रॅकर
वाहन                          -  संख्या 
रुग्णवाहिका                 -  2647
मोबाइल मेडिकल युनिट -90
पर्यवेक्षीय वाहने             -889
आरबीएसके वाहने        - 1125
एकूण                         -  4,821

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रेफेरल ट्रान्सपोर्ट कार्यक्रमातील रुग्णवाहिका व मोबाईल मेडिकल युनिट वाहनांना ट्रॅकर लावण्यासंदर्भात शासन निर्णय आहे. त्यामुळे सर्वच वाहने संपर्कात राहतील. यासंदर्भात पुढील निर्देश आल्यावर जिल्हास्तरावर कार्यवाही करू.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक,अकोला
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watch on ambulances and medical vehicles