अकोला : ‘शिवभोजन’वर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच!

३४ शिवभोजन केंद्रांवर लागणार कॅमेरे; ३१ जानेवारीपर्यंत मुदत
akola
akola esakal
Summary

३४ शिवभोजन केंद्रांवर लागणार कॅमेरे; ३१ जानेवारीपर्यंत मुदत

अकोला : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (winter session)शिवभोजन केंद्रांवरील(shivbhojan center) गैरप्रकारांचा मुद्दा गाजल्यानंतर आता राज्यातील सर्वच शिवभोजन केंद्रांवर सीसी कॅमेरे लावण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३४ शिवभोजन केंद्रांवर सुद्धा सीसी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी शिवभोजन केंद्र चालकांना ३१ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात २६ जानेवारी २०२० पासून शिवभोजन थाळीची सुरूवात झाली. सुरवातीला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर(akola Agricultural Produce Market Committee) व सर्वोपचार रूग्णालय या दोन ठिकाणी २०० थाळी प्रतिदिन क्षमतेचे शिवभोजन केंद्र कार्यान्वित झाले.

akola
राजमाता माँ साहेब जिजाऊ महिला विद्यापीठासाठी ‘बारामती’तून बळ

त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली. या सर्व केंद्रांवरून सुरुवातीच्या काळात १० रुपये प्रति थाळी याप्रमाणे दररोज १५०० थाळींचे वाटप करण्यात येत होते. त्यानंतर थाळ्यांची संख्या वाढवून तीन हजार करण्यात आली. परंतु नंतरच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शिवभोजन थाळीची किंमत ५ रुपये प्रति थाळी करण्यात आली होती.दुसऱ्या लाटेदरम्यान शिवभोजन थाळेचे वाटप मोफत करण्यात आले. त्यामुळे सध्या शिवभोजन थाळीची लोकप्रियता वाढली आहे. त्यासोबतच गैरप्रकार सुद्धा होत असल्याचे विधीमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात अधोरेखित झाले आहे. याविषयी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश टाकल्यानंतर राज्य शासनाने प्रत्येक शिवभोजन केंद्रांवर सीसी कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने शिवभोजन थाळी केंद्रांवर ३१ जानेवारी २०२२ पूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना केंद्र चालकांना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ३४ केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश संबंधित केंद्र चालकांना देण्यात आले आहेत.

- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

akola
अकोला जिल्ह्यात मालमत्ता गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले!

काय आहेत शासनाचे आदेश

प्रत्येक शिवभोजन केंद्रामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे अनिवार्य राहील. संपूर्ण शिवभोजन केंद्राची जागा व्यापेल अशा पद्धतीने सीसीटीव्ही यंत्रणा शिवभोजन केंद्रात बसवण्यात यावी.शिवभोजन केंद्राच्या रचनेनुसार एक किंवा अधिक सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे आवश्यक राहील. जेणेकरुन शिवभोजन केंद्र दिसू शकेल.शिवभोजन केंद्र चालकाने शिवभोजन वाटपाच्या विहित कालावधीतील कमीत-कमी मागील ३० दिवसांचे प्रक्षेपण तपासणीसाठी उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी, तसेच सदर प्रक्षेपणाचा डेटा संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यकता लागेल तेव्हा तपासणीसाठी पेड ड्राईव्ह उपलब्ध करुन द्यावा.शिवभोजन केंद्रांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची कार्यवाही ३१ जानेवारी २०२२ पर्यंत करुन घेण्यात यावी.शिवभोजन केंद्राची देयके अदा करताना तसेच शिवभोजन केंद्रांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा अनियमितता आढळून आल्यास प्रक्षेपणाची तपासणी करुन अधिकाऱ्यांनी कायवाही करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com