esakal | पाण्याचे संकट वाढणार, पाणीपट्टी न भरणाऱ्यांचा पुरवठा खंडित करण्याचा आदेश

बोलून बातमी शोधा

पाण्याचे संकट वाढणार, पाणीपट्टी न भरणाऱ्यांचा पुरवठा खंडित करण्याचा आदेश

पाण्याचे संकट वाढणार, पाणीपट्टी न भरणाऱ्यांचा पुरवठा खंडित करण्याचा आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः पाणीपुरवठा योजनांचे विद्युत देयक व पाटबंधारे विभागाचे पाण्याचे देयक थकल्याने प्रादेशिक पाणीपुरवठा योजना संकट आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ८४ आणि ६४ खेडी या दाेन प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनांच्या पाणीपट्टी वसुलीसाठी जिल्हा परिषद व पंचातय समिती प्रशासनाने कठाेर उपाय याेजना सुरू केल्यात. पाणीपट्टी न भरणाऱ्यांचा पुरवठा खंडीत करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात ग्रामीण भागातील पाण्याचे संकट वाढणार आहे.

जिल्ह्यात ८४ आणि ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांमधून अर्धा जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो. मात्र पाणीपट्टी माेठ्याप्रमाणात थकत असल्याने या दोन्ही योजना अडचणीत आल्या आहेत. महावितरणने या योजनांचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याने अनेक आठवडे पाणीपुरवठा बंद होता. आता पाटबंधारे विभागानेही पाण्याचे देयक थकल्याने कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे ग्राम विकास अधिकाऱ्यांनी ग्राम पंचायतींना पत्र पाठविले आहे. पाणीपट्टी वसुुलीसाठी पथके गठित करण्यात आली असून, या पथकास खातेदारांची यादी देण्याची सूचना बीडीओंनी दिली आहे. वसुली पथक येणाऱ्या दिवशी गावात दवंडी देण्यात येणार आहे. वसुलीसाठी शिबिराचे आयाेजन करण्याचे व तेथे संबंधित पं.स. व जि.प. सदस्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.

..............

अशी आहे थकबाकी

४३ काेटी ५५ लाख ६४ हजार २६६ थकबािक

पं.स. मागणी थकबाकी

अकाेला ३५२८५०२९५ ३५२०३८४८०

अकाेट ७४३२४१९८ ६९४७२६३२

बाळापूर १०९९१९०१ १०६२०९९७

तेल्हारा ४०८६०६३ ३४३२१५७

संपादन - विवेक मेतकर