तेल्हारा तालुक्यात पाणीटंचाईची समस्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water scarcity problem in Telhara wan water supply scheme akola

तेल्हारा तालुक्यात पाणीटंचाईची समस्या!

तेल्हारा : मुबलक पाण्याचे स्तोत्र असलेल्या हनुमान सागराचे बारमाही पाणी उशाशी असून सुद्धा पाणीदार तेल्हारा तालुक्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. बहुतांश गावात कुपनलिकेतून पाणीपुरवठा होत आहे. परंतु, ४४ डिग्रीच्यावर तपणाऱ्या उन्हाने कुपनलिका तळाला लागत आहेत. उन्हाळ्याच्या पहिल्याच महिन्यात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. वान प्रकल्पामधून मंजूर योजनेचे भिजत घोंगडे कायम आहे. नागरिकांच्या या कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेकडे नजरा लागल्या आहेत.

सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे, तापमान झपाट्याने वाढत आहे. गावागावात पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. गावात असलेल्या उपलब्ध पाणी पुरवठा योजना ह्या बहुतांश कुपनलिकेवर विद्युतपंप बसून केले असल्याने कुपनलिकांची पाण्याची पातळी खोल गेल्याने पाणीपुरवठा करण्यास कमकुवत होत आहेत. परिणामी गावात पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. तालुक्यातील १०३ गावातील ६३ ग्रामपंचायतमधील फक्त सहा गावांना वान पाणीपुरवठा योजनेद्वारा पाणीपुरवठा होतो. उर्वरित बहुतेक गावात पाण्याचे स्तोत्र कुपनलिकाच आहेत. विहिरी बंद पडल्या सारख्याच आहेत, त्यामुळे पाणीटंचाईची झड नागरिकांना बसत आहे. तालुक्यातील मोठ्या गावात हा प्रश्न बिकट होत आहे. वान वारी हनुमान सागर प्रकल्प पाणी पुरवठा योजनेतून तालुक्यातील संपूर्ण गावासाठी पाणी पुरवठा योजना शासन दरबारी मंजूर झाली आहे. परंतु, या धरणातून शेगाव, अकोला, खामगाव, जळगावसाठी पाणीपुरवठा केला जात आहे व आता नव्यानेच बाळापूरसाठीही पाण्याचा प्रस्ताव मंजूर आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात या धरणातून पिण्याचे पाणी आरक्षित असले, तरी तालुक्यातील जनता मात्र अजूनही वान धरणाच्या पाण्यासाठी आसूसलेली आहे. मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनीही योजना सन २०१४-१५ मध्ये मंजूर करून आणली होती. या योजनेत सर्वेक्षण झाले, झोन पडले होते. परंतु, नंतर सत्तापरिवर्तन झाले व या योजनेचे भिजत घोंगडे राहिले. नंतर पुन्हा आता वान हनुमान सागर प्रकल्प योजनेचे पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायतींकडून ठराव व निविदा प्रक्रिया सुरू झाली होती, असे असले तरी ही योजना अद्याप सुरुवात झाली नसल्याने नागरिकांना उन्हाळ्यात सुद्धा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात या योजनेचे पाणी पोहोचावे या उदात्त हेतूने ही योजना मंजूर असली, तरी अद्यापपर्यंत नागरिकांना या योजनेची प्रतीक्षाच आहे. ही कायमस्वरुपी पाणीटंचाई निवारण करणारी योजना असल्याने तालुक्यातील खारपान पट्टा, सातपुडा पर्वत पायथा व मध्यभाग, अशी सर्व गावे या योजनेच्या पाण्याची चातकासारखी वाट पाहत आहेत.

तेल्हारा तालुक्यातील पाणीपुरवठा योजना

८४ खेडी पाणीपुरवठा ः सहा

प्रादेशिक नळयोजना ः चार

स्वतंत्र नळ योजना ः ७५

विद्युत पंप योजना ः ७१

हातपंप ः २७०

हातपंप पाणी योजना ः ११

तेल्हारा तालुक्यातील पाणीपुरवठा योजना

८४ खेडी पाणीपुरवठा ः सहा

प्रादेशिक नळयोजना ः चार

स्वतंत्र नळ योजना ः ७५

विद्युत पंप योजना ः ७१

हातपंप ः २७०

हातपंप पाणी योजना ः ११

Web Title: Water Scarcity Problem In Telhara Wan Water Supply Scheme Akola

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top