esakal | अकोला : तीन दिवसांपासून संततधार, अनेक घरे पाण्याखाली
sakal

बोलून बातमी शोधा

akola rain

VIDEO : अकोल्यात तीन दिवसांपासून संततधार, अनेक घरे पाण्याखाली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : गेले तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस (heavy rain akola) सुरू आहे. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यातही वाढ झाली असून शहरातील अनेक भागात पाणी शिरले (akola rain update) आहे.अनेक घराच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरले आहे. मोर्णा नदीला पूर (morna river flood akola) आला असून नदीकाठच्या गावांमध्ये देखील पाणी घुसले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांनी सतकर्तेचा इशारा दिला आहे. (water stagnated in many areas of akola due to heavy rain)

हेही वाचा: शिक्रापूरातील दहा घरे आणि दहा दुकाने तीन दिवसांपासून पाण्यात

अकोला शहरातील डाबकी रोड, जुने शहर, घुसर मोठी उमरी, रतानलाल प्लॉट, तसेच जवाहर नगर, गोकुळ कॉलनी ,प्रसाद सोसायटी, गोइंका लेआउट, मुकुंद नगर आदी भागांमध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे एकच तारांबळ उडाली. महानगरपालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे तसेच जनरेटरची संख्या कमी असल्यामुळे हे पाणी काढण्यास बरीच कसरत करावी लागली.

पावसामुळे परिसरातील गाड्या देखील पाण्याखाली गेल्या आहेत.

पावसामुळे परिसरातील गाड्या देखील पाण्याखाली गेल्या आहेत.

न्यू खेतान नगर कौलखेड परिसरात घराच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरले असून नागरिक मदतीची वाट पाहत आहेत.

न्यू खेतान नगर कौलखेड परिसरात घराच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरले असून नागरिक मदतीची वाट पाहत आहेत.

अकोट, तेल्हारा तालुक्यात पावसाचा जोर अधिक असल्याने या तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्प तुटुंब भरले आहेत. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी (ता.२१)सकाळपर्यंत अकोला जिल्ह्यात सरासरी १०.८ मि.मी. पाऊस नोंदविण्यात आला. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट, तेल्हारा तालुक्यात १५ मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला होता. अकोल्यातही १०.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. मूर्तीजापूरमध्ये १४.४ मि.मी. पाऊस नोंदविण्यात आला. या पावसामुळे पिकांना जिवदान मिळालेले आहे. पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. त्यातही गुरुवारी (ता.२२) पाऊस जोराचा होऊ शकतो, असा अंदाज आहे. बुधवारी तेल्हारा तालुक्यात दमदार पाऊस झाला. आगर, दानापूरसह काही परिसरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.

खडकी बस स्टॅंडवर वाहतूक ठप्प झाली असून दुकान आणि अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये आठ-दहा फूट पाणी साचले आहे.

खडकी बस स्टॅंडवर वाहतूक ठप्प झाली असून दुकान आणि अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये आठ-दहा फूट पाणी साचले आहे.

अकोट तालुक्यातील मार्डी, खिरकुंड गावांना सतर्कतेचा इशारा

तालुक्यातील मार्डी, व खिरकुंड या दोन गावांना सतर्क तेचा इशारा देण्यात आला आहे. खिरकुंड लघु पाटबंधारे चा काही भाग अकोट तालुक्यात येत असून सतत च्या पावसामुळे धरणाच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. धरण डोंगराळ भागात असल्याने रात्री येणाऱ्या पावसाने सांडवा वाहण्याची शक्यता असून अकोट तालुक्यातील मार्डी, खिरकुंड या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पुढील दोन दिवस सतर्कतेचा इशारा

नागपूर वेदशाळेने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील अकोल्यासह काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. ता. २२ आणि २३ असे दोन दिवस अकोला जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

loading image