Akola News : पिण्याच्या पाण्यासाठी ठिय्या आंदोलन; ४७ दिवसांपासून पुरवठाच नाही, प्रशासन नरमले

पाणीपुरवठा व्यवस्थित होईपर्यंत टँँकरने पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
water supply issue akola drinking water no supply for 47 days administration marathi news
water supply issue akola drinking water no supply for 47 days administration marathi newssakal

अकोला : ऑक्टोबर हिटने नागरिक त्रस्त असताना गेले ४७ दिवसांपासून अकाेला, बाळापूर तालुक्यातील ६४ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने ग्रामस्थांना साेबत घेत बुधवारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात ठिय्या आंदाेलन केले. अभियंत्यांवर प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर अखेर प्रशासन नरमले. पाणीपुरवठा व्यवस्थित होईपर्यंत टँँकरने पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अकाेला तालुक्यातील ६४ खेडी खांबाेरा प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेचा पाणी पुरवठा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने विस्कळीत रहातो. अनेक ठिकाणी गळतीसह मोटारपंप नादुरुस्त असल्याने गेले ४७ दिवसांपासून या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणीच मिळाले नाही.

त्यामुळे तलाव, नदी, नाल्याच्या दूषित पाण्यावर त्यांना तहान भागवावी लागत असताना अधिकारी, अभियंते मात्र कंत्राटदारांकडून कमिशन खान्यात गुंतलेले असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी करीत जि.प.च्या अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. अनेकदा ग्रामस्थ आंदाेलनही करूनही त्याची गांभिर्याने दखल घेतली जात नाही.

याेजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी काेट्यवधी रुपये खर्चही केले तरीसुद्धा नियमित पाणी पुरवठा हाेत नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हा परिषदेत धाव घेत ठिय्या आंदोलन केले. यावेळी मजलापूर, म्हैसांग, धामणा, दापुरा, कट्यार, अंबिकापूर या गावांतील ग्रामस्थसाेबत होते.

या ठिय्या आंदाेलनात जि.प. गट नेते तथा जिल्हा प्रमुख गाेपाल दातकर, अकोला पूर्वचे प्रमुख राहुल कराळे, उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, ज्ञानेश्वर गावंडे, शिवसेनेचे जि.प. सदस्य प्रशांत अढाऊ, गणेश बाेबडे, गाेपाल भटकर, संजय अढाऊ, संजय भांबेरे, गजानन बाेराळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवा माेहाेड यांच्यासह लकी गावंडे, अक्षय टिपरे, गाेापल नावकार, श्रीकांत भुईभार, गाेपाल ठकारे, रामदसिंग डाबेराव, आस्तिक चव्हाण, गजानन पुंडकर (उमरी) आदींसह परिसरातील सरपंच व ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

२१ गावांत टँँकरने पाणीपुरवठा

योजनेंतर्गत येणाऱ्या २१ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यास जिल्हा परिषद प्रशासनाने मंजुरी दिली. यात मजलापूर, जलालाबाद, अंबिकापूर, आगर, पाेळादी, गाेत्रा, बहिरखेड, निपाणा, धामणा, गांधीग्राम, गाेपालखेड आदी गावांचा समावेश आहे.

एक पंप सुरू, दुसऱ्याची दुरुस्ती

पाणी पुरवठा याेजनेमध्ये १५० अश्व शक्तीचे दाेन पंप आहेत. एका पंप तातडीने सुरू करण्यात आला असून, दुसरा पंप तीन दिवसात सुरू करण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करणार असल्याचे अभियंत्यांनी सांगितले.

बेताल कारभाराचा फटका

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गाेपाल दातकर यांनी आंदाेलनाच्या ठिकाणाहूनच मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी यांच्याशी संपर्क साधला. ग्रामीण पाणीपुरवठा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बेताल कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसत असल्याचे दातकर म्हणाले. त्यानंतर उपाय याेजना करण्याचे चक्र तातडीने फिरली. अभियंते चर्चेसाठी थेट सीईओंकडे गेले व पाणीपुरवठ्याबाबत तोडगा काढला.

याकडे वेधले लक्ष

  • गतवर्षी ऑगस्ट महिन्यात याेजनेच्या पुर्नज्जीवनासाठी निधी मंजूर.

  • मजिप्राने केवळ पाईप व नवीन टाकीसाठी निविदा प्रक्रिया राबविली.

  • नवीन पंपासाठी वर्षभरानंतर यंदा ऑगस्ट महिन्यात निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

  • पंप उपलब्ध होण्यासाठी चार-पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com