सूर्य आग ओकतोय!

उष्णतेची लाटः पारा सलग तिसऱ्या दिवशी ४३ अंशावर
weather update akolaHeat wave rises to 43 degrees
weather update akolaHeat wave rises to 43 degreessakal
Updated on

अकोला : अकोलेकरांना गेले आठवडाभरापासून उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. मार्चमध्येच पार ४३ अंश सेल्सिअसपुढे गेला असून, गेले तीन दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहे. बुधवार आणि गुरुवार असे सलग दोन दिवस अकोल्याचे तापमान ४३.१ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान हे तीन अंश सेल्सियसने अधिक असेल किंवा सलग दोन दिवस ४५ अंश सेल्सियस पेक्षा अधिक तापमान असेल अशा स्थितीला उष्णतेची लाट असे संबोधले जाते.

वातावरणाचे तापमान ३७ अंश सेल्सियस असेपर्यंत मानवाला काही त्रास होत नाही. त्यानंतर मात्र मानवी शरीर वातावरणातील उष्मा शोषून घेऊ लागते. त्याचे विपरित परिणाम मानवी शरीरावर होतात. अकोल्यात सलग तीन दिवसांपासून उष्णतामान हे ४३ अंशाच्या पुढे असल्याने मार्चमध्येच नागरिकांना मेचा अनुभव आला.

उष्माघाताची ही आहेत लक्षणे

उष्णतेमुळे होणारा शारीरिक त्रास किरकोळ ते गंभीर स्वरुपाचा असू शकतो. किरकोळ त्रासाच्या स्वरुपात शरीरावर उष्णतेमुळे रॅशेश उमटणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे अशा स्वरुपाचा त्रास असतो. गंभीर प्रकारात उष्माघात होतो. यात व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.

यांना आहे अधिक धोका

उष्णतेच्या लाटेचा धोका ज्या व्यक्तींना आहे त्यामध्ये उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृद्ध व्यक्ती, लहान बालके, मुले, स्थूल व्यक्ति, अयोग्य परिधान केलेले लोक, पुरेशी झोप न झालेल्या व्यक्ती, गरोदर महिला, अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग, अपस्मार रुग्ण, दारुचे व्यसन असणारे लोक, काही विशिष्ट औषधी घेत असलेले लोक, बेघर लोक इ. गटांतील लोकांचा समावेश होतो. या अतिजोखमीच्या गटातील लोकांनी आपली काळजी घेणे आवश्यक आहे.

या उपाययोजना करा

  • पुरेसे पाणी प्या.

  • प्रवास करत असाल तर पाणी सोबत ठेवा.

  • हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा.

  • उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा.

  • उन्हात जातांना टोपीखाली ओलसर कपडा ठेवा.

  • पाळीव प्राण्यांचा सावलीत, थंडाव्याच्या ठिकाणी ठेवा.

  • ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.

हे लक्षात ठेवा

  • शक्यतो उन्हाच्या वेळेस घराबाहेर जाणे टाळा.

  • कष्टाची कामे उन्हात करू नका.

  • पार्क केलेल्या वाहनात मुलांना ठेवू नका.

  • गडद रंगाचे व तंग कपडे वापरू नका.

  • उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक घर हवेशीर ठेवा.

  • मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स टाळा.

  • खूप प्रथिने युक्त अन्न तसेच शिळे पदार्थ खाऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com