तेल्हारा तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather update monsoon rains in Telhara taluka tree fell Damage of shop and farmers

तेल्हारा तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी

तेल्हारा : तालुक्यात गुरुवारी (ता.१९) सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान अचानक वदळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहत होता, तर बेलखेडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला.वादळी वाऱ्यामुळे बेलखेड येथील एका रसवंतीवर झाड पडले, त्याचबरोबर चितलवाडी येथील शेतकरी शिला इंगळे यांच्या शेतातील पपईचे अनेक झाडे जमिनदोस्त झाल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा शेतात असलेला कांदा भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यात काही ठिकाणी सौम्य पाऊस पडला, तर काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. यामध्ये तेल्हारा, गाडेगाव, थार, कोठ रायखेड, तुदगाव, वाकोडी आदी गावांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. परंतु, सर्वात जास्त पाऊस बेलखेड येथे झाल्याची माहिती आहे.संबंधित विभागाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून पंचनामा करून आर्थिक मदत करण्याची मागणी नुकसानग्रस्तांच्या वतीने करण्यात येत आहे.

पहिल्याच मॉन्सूनपूर्व पावसात नुकसान

जिल्ह्यात एकीकडे भिषण उष्णतामान असताना तेल्हारा तालुक्यातील काही भागात मात्र वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मॉन्सूनपूर्व पहिल्याच पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गतवर्षी पावसाळ्यात तेल्हारा व अकोट तालुक्यात फळबागांचे मोठे नुकसान झाले होते.

ढगाळ वातावरण व कडक ऊन

मॉन्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी जिल्ह्यात संमिश्र वातावरण अनुभवयाला मिळत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी कडक उन्हामुळे जिवाची लाहीलाही होत आहे. जिल्ह्यात २३ तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Weather Update Monsoon Rains In Telhara Taluka Tree Fell Damage Of Shop And Farmers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top