esakal | जागतिक पर्यावरण दिन : तुम्हाला सुगरण पक्षी तर माहित असेल, तसेच आहे त्याचे खोपा विणण्याचे कौशल्य, लागतात इतके दिवस
sakal

बोलून बातमी शोधा

sugran bird.jpg

आईच्या जीवाची आपल्या लेकरासाठी होणारी घालमेल, माया, ममता, काळजी बहिणाबाईंनी चौधरींच्या कवितेतील पंक्ती जीवाला घोर लावून जातात. ज्या सुगरण पक्षावरून ही कविता बहीणाबाईंना सुचली ते दिसायला जसे मोहक असतात तशीच त्यांची कलाकुसरही सुबक असते.

जागतिक पर्यावरण दिन : तुम्हाला सुगरण पक्षी तर माहित असेल, तसेच आहे त्याचे खोपा विणण्याचे कौशल्य, लागतात इतके दिवस

sakal_logo
By
सागर कुटे

अकोला : अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने, झोका झाडाले टांगला, या बहिणाबाईंनी चौधरींनी सुगरणीच्या कौशल्याचे वर्णन केले आहे. लहानपणी सुगरणीचा खोपा पाहायला भलती हौस. सुगरण पक्षी कसा दिसतो, हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसते, मात्र हे सुगरणपक्षी खोपा कसा तयार करतात हे देखील विशेष आहे.

आईच्या जीवाची आपल्या लेकरासाठी होणारी घालमेल, माया, ममता, काळजी बहिणाबाईंनी चौधरींच्या कवितेतील पंक्ती जीवाला घोर लावून जातात. ज्या सुगरण पक्षावरून ही कविता बहीणाबाईंना सुचली ते दिसायला जसे मोहक असतात तशीच त्यांची कलाकुसरही सुबक असते. सुगरणमध्ये नर पक्षी घरटी विणतो. मादी पक्षी त्याचे कौशल्य पाहून निरखून पाहतात व ते ठिकठाक आहे की नाही हे पाहून त्यात रहायच की नाही हे त्या ठरवतात. एक घरटे विणण्यासाठी सुगरण पक्षाला सुमारे 14 ते 17 दिवस लागतात.

हेही वाचा - आता यापुढे एकही कंटेमेंट झोन वाढता कामा नये, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची प्रशासनाला तंबी

त्याच्या साहित्यासाठी तो 500 ते 600 वेळा चकरा मारतो. पिलांना वाऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून घरट्याला आतून सुगरण मादी किंचित चिखल लावते. हे सुगरण पक्षी घरटी विणतात त्यावरून मला नेहमी प्रश्न पडतो हत्ती, घोडे, बैलांसारखे मोठ्या शरीराच्या प्राण्यांना आपले स्वतःचे घर बनवता येत नाही पण हे चिमुकले पक्षी आपल्या चोचीत गवत-पात्या गोळा करुन सुंदर विणीचा खोपा तयार करतात. झाडाच्या फांदीला धरून ह्यांच्या पायाभरणीला (विणण्याला) सुरुवात होते.

सुगरण पक्ष्यांची संख्या झाली कमी
पूर्वी मोठ्या प्रमाणात आणि सहजगत्या आढळणाऱ्या सुगरण पक्ष्यांची संख्या गेल्या काही वर्षांत घसरणीला लागली असल्याचे पक्षीतज्ज्ञांच्या लक्षात आले आहे. लोकसंख्येतील वाढ आणि विकास, यामुळे ही संख्या कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दुष्काळाचे भाकित वर्तवतात सुगरणपक्षी?
विहीरीवरील घरट्यांमधून काही पक्षी पाण्यात अंडी फेकत असल्याचे निरीक्षणात आढळलेे. शेतकऱ्यांच्या मते पक्षी जेव्हा अंडी पाण्यावर ढकलून देतो, तेंव्हा दुष्काळ पडतो. गेल्यावर्षी दुष्काळ असल्याने अशीच स्थिती होती. गवत कमकुवत असल्यामुळेच सुगरणींची घरटी पडत असल्याचे समोर आले आहे. दुष्काळाने असे घडू शकते. कमी पावसामुळे गवताची वाढ खुंटली असल्याचे प्राणीशास्त्रांचे म्हणणे आहे.

loading image
go to top