
रिसोड तालुक्यातील आसेगाव ते वनोजा या मार्गाचे रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. रस्ताकामावर देखरेख ठेवणाऱ्या युवा अभियंत्याचा टिप्परखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना आसेगाव ते वनोजा मार्गावर ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.
रिसोड (वाशीम) : रस्ताकामावर देखरेख ठेवणाऱ्या युवा अभियंत्याचा टिप्परखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना आसेगाव ते वनोजा मार्गावर ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.
रिसोड तालुक्यातील आसेगाव ते वनोजा या मार्गाचे रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी वाशिम येथील युवा अभियंता सत्यप्रकाश उर्फ सोनु कैलास खामकर (वय २५) यांची नियुक्ती करण्यात आली होती.
या मार्गावर मुरूम पसरवित असताना टिप्पर चालकाचे दुर्लक्ष झाल्याने सत्यप्रकाश हा टिप्परखाली आला त्यांना लगेच वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. सत्यप्रकाश उर्फ सोनु हा येथील जेष्ठ पत्रकार कैलास खामकर व भाजपा महिला आघाडीच्या कल्पना खामकर यांचा मोठा मुलगा आहे. सदर घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
संपादन - सुस्मिता वडतिले