
Akola Attack
sakal
शिरपूर जैन : शिरपूर येथील नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीमध्ये शुल्लक कारणावरून येथील ओमकार वाढे (वय २२) या तरुणास धारदार शस्त्राने मानेवर व छातीवर वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी ३ ऑक्टोबर रोजी दाखल फिर्यादीवरून तीन आरोपी विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर प्रकरणामुळे मिरवणुकीमध्ये व गावांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.