सासू, सासरे व पत्नीचा त्रास अन् कंटाळलेल्या युवकाने उचलले टोकाचे पाऊल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सासू, सासरे व पत्नीचा त्रास अन् युवकाने उचलले टोकाचे पाऊल

शेगाव (जि. बुलडाणा) : ‘कमी पगाराची नोकरी आहे, घर लहान आहे’ असे बोलून सासू-सासरे व पत्नी भावाला त्रास देत होते. त्यांच्या त्रासामुळे माझा भाऊ रामेश्वर मसने याने गळफास लावून आत्महत्या केली, अशा आशयाची तक्रार मृताचा भाऊ राजेश्वर सुभाष मसने (वय २८ वर्ष रा. फुलेनगर’ यांनी शहर पोलिस स्टेशनला दिल्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजाभाऊ रामेश्वर सुभाष मसने (वय ३२ वर्षे) हा युगधर्म पब्लिक स्कूल खामगाव येथे शिक्षक म्हणून नोकरी करीत होता. त्याचे लग्न बाळू ऊर्फ आनंदा महादेव घाटोळ यांची मुलगी शारदासोबत वाडेगाव तालुका बाळापूर जिल्‍हा अकोला येथे झाले होते. पगार कमी असल्यामुळे व घर लहान असल्यामुळे वारंवार सासू-सासरे व पत्नी मानसिक त्रास देऊन भांडण करीत होते.

हेही वाचा: दारूसोबत चकणा म्हणून या पदार्थांचे तर सेवन करत नाही ना?

त्याच्या त्रासाला कंटाळून माझा भाऊ रामेश्वर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. माझ्या भावाच्या मृत्यूला त्याचे सासू-सासरे व पत्नी कारणीभूत आहे. अशा तक्रारीवरून उपरोक्त तिन्ही आरोपींविरुद्ध शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक इंगळे करीत आहे.

loading image
go to top