What Eat With Liquor : दारू पिणाऱ्यांसाठी बातमी; तुम्ही या चुका तर करत नाही ना? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Liquor

दारूसोबत चकणा म्हणून या पदार्थांचे तर सेवन करत नाही ना?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आजच्या घडीला प्रत्येकजण दारू पितो. यात काही नवेही नाही. कोणी प्रमाणात आणि कधीकधी दारूच्या ग्लासाला हात लावतात तर कोणी रोजच घसा ओला करीत असतो. चांगल्या आरोग्यासाठी डॉक्टरही मर्यादित प्रमाणात दारू पिण्याचा सल्ला देतात! दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे सर्वांना माहिती आहे. मात्र, याचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण काही कमी नाही. तेव्हा दारू पिताना काय घेऊ नये हे आपण जाणून घेऊया...

मित्र किंवा नातेवाइकांची मैफिल जमली की अनेकदा दारूची पार्टी होते. गम विसरण्यासाठी, दुख दूर सारण्यासाठी, कोणताही आनंदाचा प्रसंग साजरा करताना दारू पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. खरं म्हटल तर पिणाऱ्यांना दारू पिण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज पडत नाही. लहान-सहाण प्रसंगातही ते दारू पिण्याचे कारण शोधून घेतात.

पार्टीत गेल्यावर हातात वाईनं किंवा हार्ड ड्रिंकचा ग्लास येतोच. सोबत चकणा घेतला जातो. दारूसोबत चवीने रुचकर स्टार्टर्स मिळाले की दिवसच बनला समजा. मात्र, दारू पिताना कोणत्या गोष्टी खाव्या हे महत्त्वाचे असते. अन्यथा त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा: संबंधाबाबत पतीला सांगून तुझ्या संसार तोडणार; विवाहितेला धमकी

तेलकट पदार्थ

तेलकट पदार्थाचे जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे म्हटले जाते. याचे जास्त सेवन केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो, हे सर्वांना माहिती आहे. तेलकट पदार्थ पचायला जड असतात. दारूसोबत अशा पदार्थांचे सेवन केल्याने मोठे नुकसान होऊ शकते. तसेच पचायला जड असणारे बटाटा, कांदा याचे सेवन करणे टाळले पाहिजे.

पिझ्झा

पिझ्झा हा प्रत्येकाला खायला आवडतो. याचा चाहता वर्गही फार मोठा आहे. परंतु, दारू आणि पिझ्झाचे एकाचवेळी सेवन केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. याचे रात्री सेवन केल्यास जास्त त्रास होतो. यामुळे पचनसंस्थेवर अधिकचा ताण येतो.

डार्क चॉकलेट

चॉकलेट हे आपल्यापैकी प्रत्येकाला आवडते. लहान मुलं आणि मुलींना हे विशेष प्रिय असते. काही प्रमाणात चॉकलेट खाणे हे आरोग्यासाठी चांगलेही आहे. परंतु, दारू पिल्यानंतर किंवा दारू पिताना डार्क चॉकलेट खाल्ल्याने आरोग्यासाठी हानिकारक परिणाम होतो.

हेही वाचा: भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या उन्मुक्तने केले लग्न

दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळा

दारू पीत असताना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करणे टाळले पाहिजे. दारू पिल्याने शरीरातील आम्लाचे प्रमाण वाढते. अशावेळी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाचे सेवन केले तर अपचनाचा त्रास होतो. म्हणून मद्यपान केल्यावर किंवा करण्याआधी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे टाळा.

मीठ

जास्त प्रमाणात मीठ खाणे कधीही चांगले म्हटले जात नाही. हलकेफुलके स्नॅक्स, चिप्स यासारखे मिठाचे जास्त प्रमाण असणारे पदार्थ शरीरातले पाण्याचे प्रमाण कमी करतात. दारू सोबत याचे सेवन केल्याने जास्त प्रमाणात दारू पिली जाते. हे शरीरासाठी हानिकारक आहे.

हे आहेत नुकसान

  • रिकाम्या पोटी मद्यपान टाळा

  • जास्त तेलकट, तिखट पदार्थ खाऊ नका

  • अल्कोहोल शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करून डिहायड्रेड करते

  • अल्कोहोलमुळे शरीरातील सोडिअमचे प्रमाण कमी होते

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही.)

loading image
go to top