esakal | पुण्यातील मॅनेजरने धमकी दिल्याने विदर्भातील युवकाची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील मॅनेजरने धमकी दिल्याने विदर्भातील युवकाची आत्महत्या

पुण्यातील मॅनेजरने धमकी दिल्याने विदर्भातील युवकाची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धामणगाव बढे (जि. बुलडाणा) : पुण्यातील एका कंपनीच्या मॅनेजरने वीस हजारांच्या मागणीसह नोकरीवरून काढण्याच्या धमकी दिल्याने २२ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील पळासखेड काकर येथील २२ वर्षीय मनोज महारू राठोड याने ६ ऑगस्टला धामणगाव बढे बेहरदड शिवारातील शेतात विषारी द्रव्य प्राशन केले. सात ऑगस्टला प्रकार उघडकीस आल्याने धामणगाव बढे पोलिसांत प्रकरण दाखल झाले.

हेही वाचा: पुण्यातील युवकाने केला नागपुरातील युवतीवर बलात्कार

मनोज पुण्यातील एसएस कंपनीत काम करीत होता. कंपनी मॅनेजर अमोल विश्वनाथ सिंगनाथ (वय ३५, रा. उरळी कांचन, तालुका हवेली, जि. पुणे) याने कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण केले नाही म्हणून २० हजार रुपयांची मागणी केली. तसेच नोकरीवरून कमी करून तुला रुपयाही मिळू देणार नसल्याची धमकी दिली.

आत्महत्येपूर्वी मनोजने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून हा प्रकार उघडकीस आला. याबाबत आरोपी अमोल सिंगनाथ याच्याशी संपर्क केला असता आरोपीने कोणतेही म्हणणे ऐकले नाही. मृताचे आई-वडील व नातेवाईकांनी गुरुवारी (ता. २) धामणगाव बढे पोलिस स्टेशनला धाव घेतली. पो.हे.काॕ.दीनकर भाकरे यांनी मृतास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले यावरून गुन्हा दाखल केला. पुढील तपास सपोनि चंद्रकांत ममताबादे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि आशिष गंद्रे करीत आहे.

loading image
go to top