

Electric Shock
sakal
महान: घराच्या बांधकाम सुरू असताना स्लॅबवर इलेक्ट्रिक मोटारीने भिंतीवर पाणी मारत असताना विजेचा जोरदार शॉक लागून २३ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ग्राम झोडगा येथे १२ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे झोडगा गावासह संपूर्ण महान परिसरात शोककळा पसरली आहे.