esakal | आता ऑफलाईन होणार जिल्हा परिषदेच्या सभा ; ऑनलाईनला ब्रेक, सभा प्रत्यक्ष घेण्याचे सीईओंना आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Zilla Parishad meetings will now be held offline 2.jpg

आता जिल्हा परिषदेच्या सर्वच सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता ऑफलाईन होणार जिल्हा परिषदेच्या सभा ; ऑनलाईनला ब्रेक, सभा प्रत्यक्ष घेण्याचे सीईओंना आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्व सभा खुल्या स्वरूपात घेण्यास निर्बंध लावले होते. त्यासोबतच पुढील आदेशापर्यंत सभा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्याचे आदेश दिले होते, परंतु यानंतर सर्व सभा पूर्वीप्रमाणे सुरक्षित ठेवून घेण्याचे आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या सर्वच सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे ही वाचा : शिवसेनेचा पुन्हा भाजपवर वार ! मनपा स्थायी समिती सभेत झळकले भ्रष्टाचाराचे फलक

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सर्व सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या व सर्वसाधारण सभा गत सात महिन्यांपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होत्या. दरम्यान, बहुतांश सदस्य ग्रामीण भागात राहत असल्याने ऑनलाईन सभेत नेटवर्कचा खोळंबा होत होता. त्यामुळे सदस्यांना ऑनलाईन सभेवर आक्षेप सुद्धा नोंदवला होता.

हे ही वाचा : रब्‍बीचा पेरा ६७ टक्के ! ७१ हजार ८०० हेक्टरवर गहू, हरभरा ; इतर पिकांचे पेरणी क्षेत्र केवळ ६४० हेक्टर

दरम्यान आता कोविडच्या अनुषंगाने टाळेबंदीतील निर्बंधांमध्ये शिथिलता येत असून बहुतांश जनजीवन पूर्ववत होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सभा सुरक्षित अंतर व कोविड १९ च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन पूर्वीप्रमाणे घेण्यास शासनाने परवानगी दिली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image