आदर्श शाळा विकसित करण्यासाठी संग्रामपूर जि. प. शाळेची निवड

Zilla Parishad School Sangrampur in Sangrampur taluka of Buldana district has been selected
Zilla Parishad School Sangrampur in Sangrampur taluka of Buldana district has been selected

संग्रामपूर (बुलडाणा) :  राज्यात १ हजार ५०० शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी शासनाच्‍या वतीने एक अभियान जाहीर करण्यात आले. त्यानुसार प्रथम टप्प्यात ५०० शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा शासनाने आदेश निर्गमीत केला आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा संग्रामपूरची निवड करण्यात आली आहे.

राज्यातील आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्‍या वतीने एक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या ८१ विद्यालये, विद्यानिकतने व नागरी भागातील शाळा यांचा समावेश करण्यात आला असून ४८८ शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यास महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी ५ मार्च २०२१ रोजी एका आदेशाद्वारे मान्यता दिली आहे.

यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या जिल्हा परिषद शाळा संग्रामपूरची निवड करण्यात आली आहे. त्याकरीता वाढता लोकसहभाग भविष्यात, आकर्षक शाळा इमारत, वाढती पटसंख्या, पेयजल सुविधा, शाळेसाठी संरक्षक भिंत, ग्रंथालय, वाचनालय, उत्‍कृष्ट शिक्षकांना देशाअंतर्गत/देशा बाहेरील प्रशिक्षणासाठी पाठविणे आदि १९ बाबींचा समावेश आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com