esakal | जि.प.चे कोविड सेंटर ‘जीएमसी’वरील ताण कमी करेल ः ॲड आंबेडकर

बोलून बातमी शोधा

जि.प.चे कोविड सेंटर ‘जीएमसी’वरील ताण कमी करेल ः ॲड आंबेडकर

जि.प.चे कोविड सेंटर ‘जीएमसी’वरील ताण कमी करेल ः ॲड आंबेडकर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्ह्याचे माजी खासदार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून स्थानिक आकाशवाणी केंद्रासमोरील जिल्हा परिषद कर्मचारी भवनात ५० खाटांचे कोविड केअर सेंटर गुरूवारी (ता. २२) सुरू करण्यात आले. त्याचे विधीवत उद्‍घाटन ॲड. आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याठिकाणी भरती होणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात येईल, त्यानंतर आवश्यकता भासल्यास रुग्णास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात येईल. या केंद्रामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावरील (जीएमसी) ताण कमी होईल, अशा विश्वास यावेशी ॲड. आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भवनात गुरुवारी (ता. २२) कोविड केअर सेंटरचे उद्‍घाटन वंचितचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जि.प. अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, जीएमसीच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, उपाध्यक्षा सवित्रीबाई राठोड, जिल्हा परिषदेचे गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, कृषी समिती सभापती पंजाबराव वडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, पोलिस उपविभागीय अधिकारी सचिन कदम, जिल्हा परिषद सदस्य अविनाश खंडारे, राम गव्हाणकर, दिनकरराव खंडारे, डॉ. उन्हाळे, चंद्रशेखर पांडे गुरुजी, मनोहर पंजवणी, रुग्ण कल्याण समिती सदस्य पराग गवई तसेच जिल्हा प्रशासनातील व जिल्हा परिषेदेचे अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संपादन - विवेक मेतकर