esakal | Akola - वंचित बहुजन आघाडीने राखला जिल्हा परिषदेचा गड | ZP Election
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकाश आंबेडकर

अकोल्यामध्ये जिल्हा परिषदेत वंचित गड राखणार की गमावणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या ११ जागांचे निकाल हाती आले आहेत.

ZP Election Akola - वंचित बहुजन आघाडीने राखला जिल्हा परिषदेचा गड

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अकोला जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी मंगळवारी 5 ऑक्टोबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी सरासरी 61.61% मतदान झाले. त्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया बुधवारी 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता पासून जिल्ह्यातील सात तालुक्यातील मतमोजणी ठिकाणी पार पडली.

मतमोजणी नंतर जिल्हा परिषदेच्या 14 जागांचे चित्र स्पष्ट झाले असून वंचित बहुजन आघाडीने सर्वाधिक सहा जागी विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन उमेदवार विजयी झाले असून दोन अपक्षांनी सुद्धा निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रत्येकी एक उमेदवार जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत विजयी झाले आहेत.

हेही वाचा: ZP Election : धुळ्यावर भाजपचा झेंडा? अमरीश पटेल यांचं वर्चस्व कायम

पोटनिवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे 17 सदस्य होते. आता पोटनिवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वाधिक सहा सदस्य निवडून आले असल्यामुळे वंचित बहुजन आघादीचे एकूण 23 सदस्य झाले आहेत. पोट निवडणुकीमध्ये विजय झालेल्या तेल्हारा तालुक्यातील अडगाव येथील अपक्ष प्रमोदिनी गोपाल कोल्हे या वंचित बहुजन आघाडीच्या बंडखोर सदस्या आहेत आणि मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथून विजयी अपक्ष उमेदवार सम्राट डोंगरदिवे हे भारिप बहुजन महासंघ अर्थात वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. पोट निवडणूकीनंतर जिल्हा परिषदेमध्ये वंचितचे 23, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 शिवसेनेचे 13, काँग्रेसचे चार, भाजपचे 5, तर प्रहार जनशक्ती पक्षाचा एक आणि तीन अपक्ष सदस्य असे एकूण 53 जिल्हा परिषद सदस्य झाले आहेत.

अकोला जिल्हा परिषद : (विजयी/आघाडी)

निवडणूक झालेल्या एकूण जागा : 14

1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना

2) घुसर : शंकरराव इंगळे वंचित

3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष

4) अंदूरा : मीना बावणे : वंचित

5) दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी

6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष

7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित

8) बपोरी : माया कावरे : भाजप

9) शिर्ला : सुनील फाटकर : वंचित

10) देगाव : राम गव्हाणकर : वंचित

11) दगडपारवा : किरण अवताडे मोहोड : राष्ट्रवादी

12) दानापूर : गजानन काकड : काँग्रेस

13) कुटासा : स्फूर्ती गावंडे : प्रहार

14) तळेगाव: संगीता अढाऊ: वंचित

loading image
go to top