Admission goal met 
अहिल्यानगर

अजून पहिलीचेच अॅडमिशन अडलंय

दत्ता इंगळे

नगर तालुका : शैक्षणिक वर्षाला 15 जूनपासून सुरवात होणार असल्याने दरवर्षीच पहिलीची प्रवेशप्रक्रिया मेअखेरपर्यंत पूर्ण होते. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे त्याला अडथळा आला आहे.

नगर तालुक्‍यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या 217 असून, महापालिका हद्दीत जिल्हा परिषदेच्या 17 अशा एकूण 234 शाळा आहेत. या शाळांच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कामकाज 867 शिक्षकांच्या माध्यमातून केले जाते.

दरवर्षीच मार्च महिन्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली जाते. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे प्रवेशप्रक्रियेला खीळ बसली आहे.

तालुक्‍यासह शहरातील शाळांची पहिलीच्या प्रवेशाची 3265 क्षमता असताना त्यातील फक्त 60 टक्केच पूर्ण झालेले आहे. यामध्ये 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश झालेल्या शाळांची संख्या 52, 50 ते 80 टक्के प्रवेश क्षमता आहे. 77 तर 80 टक्‍क्‍यांच्या पुढे प्रवेश झालेल्या शाळांची संख्या 80 टक्के आहे. यातील काही शाळांनी 100 टक्के प्रवेशप्रक्रिया राबविली असून, त्यासाठी त्यांनी सोशल माध्यमाचा वापर केला आहे. उर्वरित शाळांची प्रवेशप्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या शाळांची प्रवेशप्रक्रिया मे महिन्यातच पूर्ण झाली असती. मात्र, काही शाळेतील शिक्षकांची कोरोनाबाबत प्रचार व प्रसार, तसेच स्वस्त धान्य दुकानांवर देखरेख यासह सरहद्दींवर नियुक्ती करण्यात आल्याने त्याचा अडथळा प्रवेशप्रक्रियेला आला आहे. 
 

  • आकडेवारी 
  • शहर व ग्रामीण एकूण शाळा ः 234 
  • पहिलीची प्रवेश क्षमता ः 3265 
  • 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी झालेल्या शाळा ः 52 
  • 50 ते 80 टक्‍क्‍यांदरम्यानच्या शाळा ः 77 
  • 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त प्रवेश झालेल्या शाळा ः 105 

पहिलीची प्रवेशप्रक्रिया 60 टक्के झाली आहे. त्यातील काही शाळांनी सोशल माध्यमाचा वापर करून पहिलीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित शाळा लवकरच 100 टक्के प्रवेशप्रक्रिया पूर्ण करतील. 
- आर. के. कापरे, गटशिक्षणाधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT