Ahmednagar
Ahmednagar  sakal
अहमदनगर

Ahmednagar : दुश्‍मनी अच्‍छी नहीं... दोस्‍त बनाकर देख

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : गुरुवारी रात्री संगमनेरातील एका उत्सवातील कव्वालीच्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलेले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसंगाचे औचित्य साधून, ‘कभी खुद को मेरे प्यार मे भुलाकर देख.. दुश्‍मनी अच्‍छी नहीं, मुझे दोस्‍त बनाकर देख’ हा शेर पेश केला. विखे यांनी नक्की कोणाला दोस्तीचं आवतनं दिलं, याची खुमासदार चर्चा संगमनेरात आता रंगली आहे.

एका पक्षातील सहकारी ते विरोधी पक्षातील पारंपरिक राजकीय विरोधक असलेले राधाकृष्ण विखे पाटील व बाळासाहेब थोरात यांच्यामधील विळ्या- भोपळ्याचे सख्य सर्वश्रुत आहे. दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत निळवंडेच्या श्रेयवादावरून आरोप-प्रत्यारोपांची राळ उडते आहे. त्यातही संगमनेर तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गावांच्या समावेशामुळे विखे यांचा संगमनेरशी संपर्क वाढला आहे.

थोरातांचे संगमनेरातील राजकीय विरोधक कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विखेंना पाचारण करतात. गुरुवारी शहरातील ख्वाजा पीरमोहंमद सादिक दर्गा ट्रस्टच्या उर्स समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कव्वाली कार्यक्रमाला रात्री उशिरा विखे पाटील यांनी हजेरी लावीत, दर्ग्याचे दर्शन घेऊन चादर चढवली. त्यानंतर कव्वालीचा आनंदही घेतला.

ट्रस्टचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष निसार धांदल, उपाध्यक्ष निसार शेख, विश्वस्त जावेद जहागीरदार, शेख हाजी फजलू रहेमान, शम्मू हाजी लाला बेपारी, शरीफ शेख, रउफ शेख, एजाज देशमुख यांच्यासह उद्योगपती मनीष मालपाणी, भाजपचे शहराध्‍यक्ष श्रीराम गणपुले, तालुका अध्‍यक्ष डॉ. अशोक इथापे, अमोल खताळ, सतीष कानवडे, किशोर नावंदर, राहुल भोईर यांच्‍यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांचा आग्रह

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव विखे यांनी हिंदीतून भाषण केले. हा उत्सव संगमनेरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक असून, विखे परिवाराने ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यातून दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांशी जोडलेला ऋणानुबंध कायम राहिल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी शिवसेनेतून निवडणूक लढविली तेव्‍हासुद्धा सर्व समाजबांधवांनी त्‍यांना पाठबळ दिले. या दर्ग्याचे दर्शन घेतल्‍यानंतर एक नवी उमेद व प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT