Corona's "supply" in collector's office too ... two positive, 28 home quarantine 
अहिल्यानगर

कलेक्‍टर ऑफिसमध्येही कोरोनाचा "पुरवठा'...दोन पॉझिटिव्ह, 28 जण होम क्वारंटाईन

विनायक लांडे

नगर ः कोरोनाबाधितांच्या संख्येत शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक सहकारी कार्यालयाच्या सहकाऱ्यांनादेखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. जिल्हा पुरवठा विभागात देखील कोरोनाचा शिरकाव झाला असून दोन कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आठ दिवसांच्या कालावधीसाठी पुरवठा विभागाचे कार्यालयीन कामकाज बंद राहणार आहे. 

सुरवातीच्या काळात जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमणाला ब्रेक लागलेला होता. जूनपासून शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनादेखील कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट होत आहे. नगररचना, महापालिकेतील यापूर्वी काही कर्मचाऱ्यांना यापूर्वी कोरोना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातच गुरूवारी जिल्हा पुरवठा विभागातील दोन कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 

दक्षतेचा उपाय म्हणून कार्यालयातील 30 अधिकारी-कर्मचाऱ्यांचे स्त्राव तपासले आहे. दोन बाधित कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतरांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधित कर्मचाऱ्यांना आयसोलेशन विभागात दाखल करण्यात आले, तर निगेटिव्ह आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांच्या कालावधीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय बंद राहणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT