Heavy rains lashed "Ya" circles in Nagar district 
अहिल्यानगर

नगर जिल्ह्यातील "या' मंडलांत झाला मुसळधार पाऊस !

सकाळ वृत्तसेवा

नगर ः खरिपाचा हंगामाच्या मशागतीच्या कामाला वेग आला असतानाच एक जूनच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील 83 महसूल मंडलांत पावसाने काल (रविवारी) हजेरी लावली. यापैकी चार मंडलांत अतिवृष्टी झाली. 14 मंडलांत पावसाचे खाते निरंक राहिले. जूनच्या सुरवातीलाच पावसाचे जिल्ह्यात आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

यंदा हवामान खात्याने समाधानकारक होणार असल्याचे संकेत दिले. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पडणारा पाऊस खरिपाच्या हंगामासाठी चांगल्या उत्पन्नाची हमी देतो. कोरोना महामारीच्या संकटातही खरिपाच्या पूर्व मशागतीची कामे सुरू होती. त्यातच बळिराजाचे डोळे पावसाकडे लागले होते. 

31 मेची रात्री सरत असताना एक जूनचा मुहूर्त गाठत पावसाने जिल्ह्यात आगमन केले. जिल्ह्यातील 97 पैकी 83 मंडलांत पावसाने हजेरी लावली. राहाता, शिर्डी, संगमनेर, तळेगाव, समनापूर, अकोले, राजूर, ब्राह्मणवाडा, समशेरपूर, गिरगाव, साकिरवाडी, पोहेगाव, शिलेगाव, रवंदे या चौदा महसूल मंडलांत पावसाचे खाते निरंक राहिले. 

पावसाने दिलासा दिल्याने आज सोमवार रोजी जिल्ह्यातील बहुतांश बाजारपेठात बियाणे, खते आणि पेरणीविषयक वस्तूंच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून आली. दरम्यान, शासकीय आकडेवारीनुसार पावसाची सरासरी 27.76 इतकी आहे. 

अतिवृष्टी झालेले मंडल (मिलीमीटरमध्ये) 
बेलवंडी-66 
श्रीरामपूर-71 
टाकळीभान-70 
सलाबतपूर-97 

धरणातील पाणीसाठी (टक्केवारीत) 
भंडारदरा-35.18 
मुळा-28.62 
निळवंडे-44.33 
आढळा-38.96 
मांडओहळ-22.96 
घाटशीळ-4.50 
खैरी-7.50 
सीना-20.21 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT