अहमदनगर

ज्ञानेश्वर कारखान्यातील कामगारांना मिळाले विमा कवच

सकाळ वृत्तसेवा

नेवासे : तालुक्यातील भेंडे येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे एक हजार 246 कामगारांना साडे नऊ महिन्याचे कालावधी करीता दोन लाख रुपयांचे हॉस्पिटलायझेशन कोरोना विमा कवच (संरक्षण) देण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिली.

अभंग म्हणाले, "देशात आणि राज्यात सुरू असलेल्या कोरोना कोविड 19 विषाणू महामारीचे पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्यांचा सन 2020-21 चा हंगाम (ता. 15) ऑक्टोबर पासून सुरु झाल्याने कारखान्यांचे अधिकारी-कर्मचारी, साखर कामगार, ऊसतोड मजूरांना व वाहतूक कामगारांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोरोनापासून संरक्षण मिळणेसाठी आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाय करणेसाठी साखर आयुक्तालयाने राज्यातील सर्व साखर कारखान्यांना  सर्वकष अशा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

त्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर'चे प्रमुख मार्गदर्शक नरेंद्र घुले, अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील, संचालक मंडळ व कामगार संघटना यांनी कारखाना सेवेत आलेल्या कामगारांची कोरोना विमा पॉलिसी घेण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाची बाधित झाल्यास कामगारांना उपचारासाठी होणारा दवाखान्याचा खर्च भागविता यावा यासाठी कारखाना व्यवस्थापन व कामगार यांच्या संयुक्त सहभागातून घेण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कारखाना व्यवस्थापनाने कामगारांची तीन लाख रुपये रिस्क कव्हर करणारी अपघाती नुकसान घरपाई देणारी स्वतंत्र विमा पॉलिसी सुद्धा घेतली असल्याचे अभंग म्हणाले.

दरम्यान सदर विमा पॉलिसी हप्ता रक्कम तेरा लाख 36 हजार 953 रुपयांचा धनादेश अभंग यांचे हस्ते संबंधित विमा कंपनीचे प्रशासकीय अधिकारयांकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, बापूसाहेब सुपारे, कारभारी गायके, बाळासाहेब डोहाळे, विलास लोखंडे, हिरामण साळवे, संभाजी माळवदे, सचिन निकम, दत्तात्रय बोळे उपस्थित होते.
संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT