Kharat gang expelled from Akola 
अहिल्यानगर

या तालुक्‍यातील गुन्हेगारांची टोळी केली हद्दपार 

सूर्यकांत वरकड

नगर : अकोले शहरासह तालुक्‍यात संघटितपणे टोळी तयार करून दहशत निर्माण करणाऱ्या मोहन खरात याच्या टोळीला पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दीड वर्षाकरिता नगर जिल्ह्यासह नाशिक, पुणे जिल्ह्यांतील काही तालुक्‍यांतून हद्दपार केले. मोहन सखाराम खरात (वय 26), गुलाब भिकाजी खरात (वय 38), अमोल भिकाजी खरात (वय 23, तिघेही रा. कोतूळ, ता. अकोले) अशी त्यांची नावे आहेत. 

अकोले तालुक्‍यात संघटितपणे टोळी तयार करून दहशत निर्माण करणे, लोकांना मारहाण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, मारामारी करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करणे, शिवीगाळ, दगडफेक करणे आदी गुन्हे वरील तिघांविरुद्ध अकोले पोलिस ठाण्यात दाखल होते. अकोले पोलिसांनी खरात टोळीवर दोन वर्षांकरिता हद्दपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे पाठविला होता. पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी त्याला काल मंजुरी दिली. त्यात मोहन खरात व गुलाब खरात यांना दीड वर्ष नगर जिल्ह्यासह सिन्नर, इगतपुरी (नाशिक), शहापूर (ठाणे), जुन्नर (पुणे) आदी तालुक्‍यांतून हद्दपार केले. अमोल खरात याला एक वर्षाकरिता नगर जिल्ह्यासह सिन्नर, इगतपुरी (नाशिक), शहापूर (ठाणे), जुन्नर (पुणे) येथून हद्दपार केले. अहमदनगर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईकरांसाठी मोठी आनंदवार्ता! भायखळा झूमध्ये ‘जंगलचा राजा’ लवकरच दिसणार; गुजरातकडून तत्त्वतः हिरवा कंदील

Video : पहिला डाव संपला, MS Dhoni मैदानावर आला... CSK च्या खेळाडूंनी जे केलं, ते पाहून सारेच Emotional... 'माही'ची निवृत्ती?

Meta Layoffs: मेटामध्ये छाटणी! कर्मचारी चवताळले; रागात ऑफिस आणि स्नॅक्स काउंटरमधील सामान लुटले, विचित्र किस्सा चर्चेत

Mumbai: सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आयोग आक्रमक, ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

Mumbai News: दोन समुद्री टनेलमधून मुंबईत पाणी पोहोचणार! समुद्रातून शुद्ध पाणी येणार; मनोरी प्रोजेक्ट तहान भागवणार

SCROLL FOR NEXT