criminals arrest by ahmednagar police crime news esakal
अहिल्यानगर

अहमदनगर : मोक्का लागलेला फरार सराईत आरोपी जेरबंद

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) गुन्ह्यातील फरार असलेला सराईत आरोपी सोमनाथ रामदास खलाटे (वय 26, रा. खलाटवाडी, ता. आष्टी, जि. बीड) याला गेवराई भागातून अटक करण्यात आली. त्याने एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रक चालकास लुटले होते.

आरोपीला शिताफीने घेतले ताब्यात

ज्ञानेश्‍वर किसन गजरे (वय 27, रा. निघोज, ता. पारनेर) यांनी त्यांचा ट्रक लघुशंकेसाठी रस्त्याच्याकडेला थांबविला. त्यावेळेस अज्ञात दुचाकीवर पाठीमागून आलेल्या तिघांनी ट्रकच्या केबिनमध्ये घुसले. फिर्यादी व मदतनीस यांना कोयता व चाकूचा धाक दाखवून, मारहाण करून 46 हजार रुपये रोख व दोन मोबाईल फोन बळजबरीने हिसकावले होते. गजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना स्वतंत्र पथक करून आरोपींचा शोध घेण्याबाबतचा आदेश दिला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, हवालदार बबन मखरे, मनोज गोसावी , सुरेश माळी, विशाल दळवी, संतोष लोढे, शंकर चौधरी, देवेंद्र शेलार, शिवाजी ढाकणे, बबन बेरड यांनी आरोपीचा शोध घेतला. आरोपी सोमनाथ खलाटे हा गेवराई येथे असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. आरोपी सोमनाथला तेथे जाऊन शिताफीने ताब्यात घेतले.

खुन- दरोडा घालणारा सराईत गुन्हेगार

आरोपी सोमनाथ खलाटे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध आरपीएफ पुणे रेल्वे पोलिस, लोणी, कोपरगांव तालुका, राहाता, संगमनेर तालुका, एमआयडीसी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे सात गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, खुनासह दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी असे गुन्ह्यांचे स्वरुप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

Nashik Dharmantar Case: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलिसांना निर्देश!

SCROLL FOR NEXT